गुढीपाडव्या दिवशी होत्याचं नव्हतं झालं, मुंबई -पुणे महामार्गावर कारच्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Mumbai - Pune Highway Accident : गुढीपाडव्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई -पुणे महामार्गावरील खोपोलीनजीक एक गंभीर अपघात झाला. या अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुण हे खालापूरहून मुंबईकडे जात असताना घटना घडल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्याहून मुंबईकडे जाताना कार पलटी झाली
अपघातात 3 विद्यार्थ्यांचा गंभीर मृत्यू
Mumbai - Pune Highway Accident : गुढीपाडव्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई -पुणे महामार्गावरील खोपोलीनजीक एक गंभीर अपघात झाला. या अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुण हे खालापूरहून मुंबईकडे जात असताना घटना घडल्याचे वृत्त आहे. तिघांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : बायको कामावर गेल्यानंतर घरात सावत्र बापाचा 12 वर्षाच्या लेकीवर लैंगिक अत्याचार, नंतर जीवे मारण्याची दिली धमकी
पुण्याहून मुंबईकडे जाताना कार पलटी झाली
घडलेल्या घटनेनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाताना एक कार वेगाने आली आणि नंतर ती पलटी झाली. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. मृतांची नावे समोर आली आहेत. ओंकार बोरसे (22, नाशिक), लया भट्ट (23, नागपूर) आणि श्रेयश शर्मा (22, जयपूर) अशी त्यांची नावे आहेत. या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातात 3 विद्यार्थ्यांचा गंभीर मृत्यू
या कारमध्ये चार विद्यार्थी होते, त्यापैकी एक बचावला गेला, तसेच इतर तिघांचा मृत्यू झाला. तसेच एक विद्यार्थी हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर खालापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृत तरुणांचे मृतदेह कामोठे MGM येथे ठेवण्यात आले होते. मृतकांमध्ये मुंबईतील आयआयटी पवईचे विद्यार्थीही समाविष्ट आहेत.
हे ही वाचा : ग्रामीण पुण्यात बेपत्ता तरुणाची निर्घृणपणे हत्या, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ
अपघातानंतर काही तास वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.










