बायको कामावर गेल्यानंतर घरात सावत्र बापाचा 12 वर्षाच्या लेकीवर लैंगिक अत्याचार, नंतर जीवे मारण्याची दिली धमकी
crime news : बायको कामावर गेल्यानंतर घरात सावत्र बापाने मुलीशी लज्जास्पद कृत्य केलं. नंतर 12 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच, आईने पतीविरोधात गुन्हा दाखल केला. वैद्यकीय तपासातून नेमकं काय समोर आलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिला कामावर गेल्यानंतर सावत्र वडिलांनी चिमुरडीवर नको तेच...
अत्याचाराबाबत सांगितल्यास जीवे मारहण्याची धमकी
Crime News : बायको कामावर गेल्यानंतर घरात सावत्र बापाने मुलीशी लज्जास्पद कृत्य केलं. नंतर 12 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच, आईने पतीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करत आरोपी वडिलांना अटक केली, दरम्यान न्यायालयाने तुरुंगात पाठवले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबांकीमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : कोंबडी चोरण्यावरून वाद, पुतण्याने घरात घुसून काकीवर चाकूने केले वार, रक्ताच्या सड्यात मृतदेह
महिला कामावर गेल्यानंतर सावत्र वडिलांनी चिमुरडीवर नको तेच...
संबंधित प्रकरणात नवऱ्याच्या मृत्यूनंतर, चार मुलांच्या आईने जहांगीरबादमध्ये गावातील पुरुषाशी पुनर्विवाह केला. पती मजून काम करताना महिला घरकाम करत होती. पतीच्या मृत्यूनंतर महिलेनं पुरुषाशी पुनर्विवाह केला आणि तिच्यासोबत चार मुलं देखील राहत होती. तीन दिवसांपूर्वी, महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार केली की, ती कामावर जाताना तिचा नवरा तिच्या 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करायचा.
अत्याचाराबाबत सांगितल्यास जीवे मारहण्याची धमकी
दरम्यान, लैंगिक अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास नंतर जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. एके दिवशी मुलगी अनपेक्षितपणे घरी आली असता, तिला आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समजलं.
हे ही वाचा : मालमत्तेच्या कारणावरून महिलेची निर्घृण हत्या, मृतदेहाचे करवतीने तुकडे केले अन् तलावात दिले फेकून...
17 मार्च, रोजी आरोपी सावत्र वडिलांविरुद्ध पोक्सो अंतर्गत लैंगिक अत्याचारांच्या आरोपांसह गुन्हा दाखल केला. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणात फरार आरोपीला पोलिसांनी 18 मार्च रोजी अटक केली होती.










