कोंबडी चोरण्यावरून वाद, पुतण्याने घरात घुसून काकीवर चाकूने केले वार, रक्ताच्या सड्यात मृतदेह
Crime News : कौटुंबिक वादातून बुधवारी रात्री भाचा अजयने त्याच्या काकीची हत्या केली. कोंबडी चोरण्यावरून वाद झाला आणि याच वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. अजयने केलेल्या हल्ल्यात काकी रेश्मा (वय 40) हिचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोंबडी चोरल्याचा संशय
भाच्याने काकीला संपवलं
Crime News : हरयाणातील रायचंदवाला गावात एका कौटुंबिक वादातून बुधवारी रात्री पुतणा अजयने त्याच्या काकीची हत्या केली. कोंबडी चोरण्यावरून वाद झाला आणि याच वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. अजयने केलेल्या हल्ल्यात काकी रेश्मा (वय 40) हिचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : मालमत्तेच्या कारणावरून महिलेची निर्घृण हत्या, मृतदेहाचे करवतीने तुकडे केले अन् तलावात दिले फेकून...
भाच्याने काकीला संपवलं
अजयने रेश्मावर कोंबडी चोरल्याचा आरोप केला होता. याच कारणामुळे अजयने आपल्या काकीची हत्या केली होती. मृत रेश्माची सासू, लिच्छामी देवी यांच्या जबाबाच्या आधारे, पोलिसांनी अजयविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरु केला . घटनेपासून आरोपी फरार असून, त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी छापे टाकले. सुमारे 14 वर्षांपासून रेश्माचा आकाश नावाच्या तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. त्याचे मागील वर्षी निधन झाले होते.
कोंबडी चोरल्याचा संशय
पोलिसांनी तक्रारीत सांगितलं की, सुमारे 20-25 दिवसांपूर्वी अजयचे वडील अजमेर यांच्या काही कोंबड्या चोरीला गेल्या होत्या. अशोकची पत्नी रेश्माने त्या चोरल्याचा संशय होता. यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये चांगला वाद निर्माण झाला. बुधवारी रात्री 8 वाजता, अजमेरचा मुलगा अजय हातात चाकून घेऊन रेश्माच्या घरात घुसला.
रक्तात माखलेली रेश्मा अंगणातच कोसळत व्हिवळू लागली
अजयने रेश्माच्या पोटात आणि छातीवर चाकूने वार केले. रक्तात माखलेली रेश्मा अंगणातच कोसळली आणि वेदनेनं व्हिवळू लागली होती. घटनेनंतर अजयने घटनास्थळावरून पळ काढल्याचं वृत्त आहे. तिचे कुटुंबीय जखमी रेश्माला जिंद सिव्हिल रुग्णालयात घेऊन जाताना वाटेतच तिचा दुर्दैवी अंत झाला.










