मालमत्तेच्या कारणावरून महिलेची निर्घृण हत्या, मृतदेहाचे करवतीने तुकडे केले अन् तलावात दिले फेकून...
Crime News : तरुणाने संपत्तीच्या वादातून आपल्याच नातेवाईकाची हत्या केली. नंतर महिलेच्या पत्नीचे करवतीने तुकडे करून तलावात फेकल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका 32 वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मालमत्तेच्या वादातून 40 वर्षीय महिलेची हत्या
मृतदेह तलावात फेकला
Crime News : एका तरुणाने संपत्तीच्या वादातून आपल्याच नातेवाईकाची हत्या केली. नंतर महिलेचे करवतीने तुकडे करून तलावात फेकल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका 32 वर्षीय संशयिताला अटक केली. संबंधित प्रकरणाचा तपास सुरु असून त्या व्यक्तीने आपल्या महिला नातेवाईकांची निर्घृणपणे हत्या केली. ही घटना तेलंगणातील हैदराबादमध्ये घडली होती.
हे ही वाचा : सांगली हादरली, पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाची निर्घृण हत्या; मंदिरात दर्शनासाठी जात असताना संपवलं
मालमत्तेच्या वादातून 40 वर्षीय महिलेची हत्या, मृतदेह तलावात फेकला
तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली. गेल्या महिन्यात मालमत्तेच्या वादातून त्याने महिलेला काठीने मारहाण केली, ज्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याने मृतदेह बाथरूममध्ये लपवला होता. दुसऱ्या दिवशी आरोपीने एका साथीदाराच्या मदतीने संबंधित 40 वर्षीय महिलेचा मृतदेह तलावात फेकून दिला होता.
या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, आरोपी आणि त्या महिलेनं मिळून एक मालमत्ता खरेदी केली होती. महिलेला तिचा वाटा मिळवायचा होता. पोलिसांनुसार, आरोपीने दावा केला की, विधवा महिलेचे एका परपुरुषासोबत अवैध संबंध होते, याचमुळे वादविवाद व्हायचा.
हे ही वाचा : मूल होत नव्हतं म्हणून दुसरं लग्न केलं अन् लग्नानंतर पंधरा दिवसांतच घरात रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं?
तेलंगणा पोलिसांनी सांगितलं की, महिला बेपत्ता झाल्यानंतर तिची शोध घेण्यात आला. तपासादरम्यान, तलावात तिच्या शरीराचे तुकडे आढळून आले होते. पोलिसानुसार, आरोपीवर कठोर शिक्षा ठोठावली जाईल.
