मूल होत नव्हतं म्हणून दुसरं लग्न केलं अन् लग्नानंतर पंधरा दिवसांतच घरात रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Crime News : एका नवऱ्याने संतापाच्या भरात आपल्या दोन्ही पत्नींवर कुऱ्हाडीने वार करत जीवघेणा हल्ला केला. यामध्ये एका पत्नीचा मृत्यू झाला असून दुसऱ्या पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. काही दिवसांपूर्वीच आरोपीने दुसरे लग्न केले होते. मात्र या काही दिवसांत असं काय घडलं की त्यानं आपल्या दोन्ही पत्नींचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मूल होत नव्हतं म्हणून दुसरं लग्न केलं अन् लग्नानंतर पंधरा दिवसांतच घरात रक्ताचा सडा

point

नेमकं काय घडलं?

Crime News : दोन बायका फजिती ऐका ही म्हण आपण सर्वांनी ऐकलीच आहे. ही म्हण खरी ठरवणारी एक घटना समोर आली आहे. मात्र ही काही फजितीपुरती मर्यादित घटना नाही. यामध्ये रक्तरंजित थरार आहे. ही घटना घडलीये हरियाणाच्या जिंद जिल्ह्यात. एका नवऱ्याने संतापाच्या भरात आपल्या दोन्ही पत्नींवर कुऱ्हाडीने वार करत जीवघेणा हल्ला केला. यामध्ये एका पत्नीचा मृत्यू झाला असून दुसऱ्या पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. काही दिवसांपूर्वीच आरोपीने दुसरे लग्न केले होते. मात्र या काही दिवसांत असं काय घडलं की त्यानं आपल्या दोन्ही पत्नींचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, जाणून घेऊया.

हे ही वाचा : तानाजी सावंत यांच्या पुतण्याचा भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर; भाजप प्रवेश करुन परतत असताना काय घडलं?

मूल होत नसल्याने दुसरे लग्न

संतापाच्या भरात खून, हाणामाऱ्या अशा अनेक घटना आपण वाचत, ऐकत असतो. हीदेखील अशीच घटना आहे. मात्र यामागचं कारण मात्र सर्वसामान्य कारणांपेक्षा वेगळं आहे. हरियाणातील जिंद परिसरात राहणारा सुरेश कुमार याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर त्याला मूल झाले नाही. यामुळे साहजिकच त्याने दुसऱ्या लग्नाचा विचार सुरु केला. अखेर त्याने 2 मार्च 2026 रोजी दुसरे लग्न केले. त्याला वाटले की यानंतर आता आपल्याला मूल होईल आणि आपला वंश वाढेल. घरदार आनंदानं भरुन जाईल. पहिल्या पत्नीलाही आनंद होईल. मात्र आपण पाहिलेली स्वप्नं कधी अशी सहज पूर्ण होतात का? असंच सुरेश कुमारच्या बाबतीत झालं. त्याने पाहिलेली स्वप्नं पूर्ण होण्याआधीच काहीतरी भयानक घडणार आहे, याची त्याला कल्पनाही नव्हती.

दोघींवर कुऱ्हाडीने सपासप वार

दुसऱ्या पत्नीला मूल झाल्यानंतर पहिल्या पत्नीला आनंद होईल असं त्याला वाटलं होतं. मात्र घडलं भलतंच. त्याने दुसरं लग्न केल्यापासून दोघी पत्नींमध्ये सतत वाद होऊ लागले. सुरेश अखेर याला वैतागला. बुधवारी (18 मार्च) दुपारी बारा वाजता दोघींमध्ये जोरदार वाद सुरु होता. यामुळे सुरेश चांगलाच संतापला. बाजूला पडलेली एक कुऱ्हाड त्याने घेतली आणि दोन्ही पत्नींवर सपासप वार केले. दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. यामध्ये एकीचा जागीच मृत्यू झाला. संतापाच्या भरात आपण काय केले असे वाटून सुरेश घटनास्थळावरुन फरार झाला. पोलिसांना घटनेची माहिती कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. एक पत्नी अद्याप बेशुद्धावस्थेत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp