तानाजी सावंत यांच्या पुतण्याचा भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर; भाजप प्रवेश करुन परतत असताना काय घडलं?

मुंबई तक

Dhananjay Sawant Accident : सोलापूर–पुणे महामार्गावर गुरुवारी (दि. 19) मध्यरात्री भिगवणजवळ माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे तथा धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, सावंत सुदैवाने सुखरूप बचावले आहेत.

ADVERTISEMENT

Dharashiv News
Dharashiv News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धाराशिव : तानाजी सावंत यांच्या पुतण्याचा भीषण अपघात

point

भाजप प्रवेश करुन परतत असताना काय घडलं?

Dhananjay Sawant Accident, गणेश जाधव : सोलापूर–पुणे महामार्गावर गुरुवारी (दि. 19) मध्यरात्री भिगवणजवळ माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे तथा धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, सावंत सुदैवाने सुखरूप बचावले आहेत.

हे ही वाचा : सांगली हादरली, पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाची निर्घृण हत्या; मंदिरात दर्शनासाठी जात असताना संपवलं

कंटेरने दिली जोरदार धडक

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय सावंत हे बुधवारी मुंबईत झालेल्या पत्नी व कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेश सोहळ्यानंतर फॉर्च्युनर (MH 12 SE 5559) कारने परंड्याकडे निघाले होते. गुरुवारी पहाटे सुमारे एकच्या सुमारास भिगवणजवळील डाळज २ गावाच्या हद्दीत समोरून येणाऱ्या कंटेनरने (MH 12 WJ 6374) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

फॉर्च्युनरचा चक्काचूर

धडकेची तीव्रता इतकी होती की आलिशान फॉर्च्युनरच्या चालकाच्या बाजूचा भाग पूर्णतः चक्काचूर झाला. या अपघातात कारचालक आणि सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp