Maharashtra Weather : हवामानाचा लपंडाव, कधी पाऊस, तर कधी कोरडं हवामान; IMD चा अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात वातावरणात काही प्रमाणात बदल घडताना दिसून येत आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर काही भागांत कोरड्या हवामानाची शक्यता आहे. 21 ऑक्टोबर रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढे वर्तविलेला आहे. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यात वातावरणात काही प्रमाणात बदल

point

काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस

point

21 ऑक्टोबर रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढे वर्तविलेला आहे. 

Maharashtra Weather : राज्यात वातावरणात काही प्रमाणात बदल घडताना दिसून येत आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर काही भागांत कोरड्या हवामानाची शक्यता आहे. कोकणात तीन ठिकाणी कोरडं आणि तीन जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 21 ऑक्टोबर रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढे वर्तविलेला आहे. 

हे ही वाचा : ..तर 2029 मध्ये 'त्या' नेत्यांना निवडून द्यायचं नाही, जरांगेंचा थेट इशारा

कोकण 

कोकणात पालघर, ठाणे आणि मुंबईत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर येथे अहिल्यानगरची शक्यता वर्तविली आहे. नाशिक घाटमाथा, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हवामान कोरडं राहणार आहे. सातारा घाटमाथा, सातारा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, पुणे घाटमाथा येथे मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

मराठवाडा

मराठवाडा विभागात जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. 

हे ही वाचा : मुंबई: 13 मजली इमारतीला भीषण आग, 3 मुलांसह 9 जण जखमी

विदर्भ 

विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.