कुटुंबाचा विरोध पत्करुन प्रेमविवाह केला, नंतर धर्मपरिवर्तनही केले; पण अखेर व्हायचं तेच झालं!

मुंबई तक

Crime News : एका 29 वर्षीय तरुणीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन मोहम्मद अलीशी प्रेमविवाह केला. मात्र तिला हे चांगलेच महागात पडले आहे. नवऱ्याने सहा वर्षांपासून तिचा अतिशय छळ केला. यामुळे तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे संतापलेल्या नवऱ्याने तिच्यावर अॅसिड हल्ला केला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कुटुंबाचा विरोध पत्करुन मोहम्मद अलीशी प्रेमविवाह केला

point

नंतर धर्मपरिवर्तनही केले

point

पण अखेर व्हायचं तेच झालं!

Crime News : तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एका 29 वर्षीय महिलेवर तिच्या विभक्त पतीकडून भररस्त्यात ॲसिड हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात पीडितेच्या एका डोळ्याची 50 टक्के दृष्टी गेली असून, दुसऱ्या डोळ्यालाही गंभीर इजा झाली आहे. हा सर्व थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 31 वर्षीय मोहम्मद अली असे या आरोपी पतीचे नाव असून, त्याच्या सततच्या छळामुळे पीडित महिला गेल्या काही काळापासून त्याच्यापासून वेगळी राहत होती.

हे ही वाचा : Maharashtra Weather : गुढीपाडव्यादिवशी 'या' जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट

कुटुंबाचा विरोध पत्करुन मोहम्मद अलीशी प्रेमविवाह 

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिने सहा वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबाचा विरोध पत्करून मोहम्मद अलीशी प्रेमविवाह केला होता. लग्नासाठी तिने ख्रिश्चन धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्म स्वीकारला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच पतीच्या संशयी स्वभावामुळे आणि शारीरिक अत्याचारामुळे तिचे आयुष्य नरक बनले. गेल्या सहा वर्षांत तिने अनेकदा छळ सहन केला आणि दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. अखेर त्रासाला कंटाळून तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, ज्यामुळे आरोपी संतापलेला होता.

ॲसिडने हल्ला

घटनेच्या दिवशी रविवारी रात्री, मोहम्मद अली चर्चेच्या बहाण्याने पीडितेच्या घरी आला होता. त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने सोबत आणलेली ॲसिड क्लीनरची बाटली काढून तिला धमकावण्यास सुरुवात केली. जीवाच्या आकांताने महिला घराबाहेर पळू लागली असता, आरोपीने तिचा पाठलाग करून तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. यावेळी एका सतर्क शेजाऱ्याने मध्ये पडून आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे महिलेला तिथून पळ काढता आला आणि तिचा जीव वाचला.

हे वाचलं का?

    follow whatsapp