NCP नेत्या रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे नवे फोटो आले समोर
Ashok Kharat and Rupali Chakankar: नाशिकमध्ये महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात याला अटक केल्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. कारण अनेक राजकारणी हे अशोक खरातची भेट होते. त्यातच आता रुपाली चाकणकरांचे अशोक खरातसोबतचे काही जुने फोटो समोर आले आहेत.
ADVERTISEMENT

नाशिक: नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी व 'कॅप्टन' म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात याच्या अश्लील व्हिडिओच्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यातच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, विरोधकांकडून चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होत आहे.
नव्या व्हायरल फोटोंमध्ये काय?
फोटो क्रमांक 1- अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे 4 नवे फोटो आता समोर आले आहेत. त्यापैकी एका फोटोत रुपाली चाकणकर आणि अशोक खरात एकत्र उभे दिसत आहेत. खरात नारंगी-तपकिरी कुर्ता-पायजमा आणि चाकणकर पारंपरिक साडीत (पिवळ्या-हिरव्या रंगाची) दिसत आहेत. यावेळी रुपाली चाकणकरांनी अशोक खरातचा हात धरल्याचं दिसून येत आहे.

फोटो क्रमांक 2- दुसऱ्या फोटोत एखाद्या समारंभात (कदाचित जन्मदिन) दोघे एकत्र केक कापताना किंवा केक भरवताना दिसत आहेत. आसपास अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.











