Kolkata Crime : कोलकाताच्या अत्याचाराच्या घटनेनंतर 'ती' पोस्ट व्हायरल! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला नेटकऱ्यांनी सुनावलं
Kolkata Rape & Murder Case : कोलकातामधील आर.जी.कार वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. डॉक्टरांच्या संघटनांकडून देशभरात निदर्शने केली जात आहेत. तसच सोशल मीडियावरही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पोस्टच्या माध्यमातून परदेशी महिलांना दिला 'हा' सल्ला
ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सर तान्याच्या पोस्टवर नेटकरी भडकले
कोलकाताच्या अत्याचाराच्या घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Kolkata Rape & Murder Case : कोलकातामधील आर.जी.कार वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. डॉक्टरांच्या संघटनांकडून देशभरात निदर्शने केली जात आहेत. तसच सोशल मीडियावरही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. कोलकाताच्या अत्याचाराच्या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. आरोपील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणात नवनवीन ट्विस्ट समोर येत असतानाच प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सर तान्या खानीजोनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळं सोशल मीडियावर खळबळ उडाली असून नेटकऱ्यांनी तान्याला चांगलच सुनावलं आहे. ( netizens slams tavel Influencer Tanya Khanijow on instagram post about kolkata rape and murder case. After the incident of rape and murder case in Kolkata, many have expressed their anger through social media. The demand that the accused should be severely punished is getting stronger)
ADVERTISEMENT
पोस्टच्या माध्यमातून परदेशी महिलांना दिला 'हा' सल्ला
दुसऱ्या देशातील महिलांनी भारतात येऊ नये, असा सल्ला तान्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या महिलांना दिला आहे. तान्यानं पोस्टमध्ये लिहिलंय, भारतात महिलांच्या सुरक्षेबाबत वाईट परिस्थिती आहे. जोपर्यंत नेतेमंडळी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेत नाहीत. तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत भारतात येऊ नका. परदेशात राहणाऱ्या सर्व महिलांना माझी विनंती आहे.
हे ही वचा >> Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा संजय राऊतांनी घेतला समाचार, म्हणाले; ""जवानांच्या रक्ताचे सडे..."
हे वाचलं का?
तान्याच्या पोस्टवर नेटकरी भडकले
तान्यानं पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. देशाला बदनाम केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी तान्यावर केला आहे. एकाच मुद्द्याला प्रत्येक ठिकाणी लागू करून संपूर्ण देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं म्हणत लोकांनी तान्याला सुनावलं आहे. @shantiswarup4u या नावाच्या यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, स्वत:ला भारतीय म्हणण्यात तुला लाज वाटली पाहिजे. देशातील सर्वात शांत राज्यात ही घटना घडली आहे. या राज्याचे मुख्यमंत्रीही एक महिला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशाला बदनाम करू शकत नाही.
हे ही वचा >>Narendra Modi: 'आरोपींना कठोर शिक्षा...', 'त्या' प्रकरणावरून PM मोदी प्रचंड संतापले!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT