9 वीत शिकणाऱ्या मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून तरुण करायचा टॉर्चर, पीडितेनं रेल्वेखाली उडी मारून संपवलं जीवन
Crime News : तरुणाने अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवले, नंतर अनेकदा तिचा विनयभंग केला. संबंधित मुलगी ही इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत होती. संबंधित विद्यार्थीनीने ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून रेल्वेखाली उडी मारून आपलं जीवन संपवलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणीचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Crime News : एका तरुणाने अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवले, नंतर अनेकदा तिचा विनयभंग केला. संबंधित मुलगी ही इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत होती. संबंधित विद्यार्थीनीने ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून रेल्वेखाली उडी मारून आपलं जीवन संपवलं. ही घटना पंजाबमधील मोहाली येथील असल्याचे वृत्त आहे. संबंधित प्रकरणात मयताच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा : मालमत्तेच्या कारणावरून महिलेची निर्घृण हत्या, मृतदेहाचे करवतीने तुकडे केले अन् तलावात दिले फेकून...
तरुणीचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल
वडिलांच्या तक्रारीत नमूद केलं, जीआरपीने आरोपी तरुणाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणे, अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणे याच आरोपांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
मयत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, मुलगी ही मूळची उत्तर प्रदेशची आहे. रोजगारासाठी आम्ही येथे स्थायिक झाला होतो. मजुरीच्या कामावरच आमचा उदरनिर्वाह आहे. एक रीशू नावाचा तरुण मुलीचा छळ करत होता. आरोपीने फसवणूक करून विद्यार्थीनीचा एक अश्लील व्हिडिओ बनवला होता, नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, आरोपी या व्हिडिओचा वापर करून विद्यार्थिनीचे शारीरिक शोषण करत होता. 12 मार्च रोजी आरोपी दारूच्या नशेत त्यांच्या घरी आला आणि विद्यार्थीनीला जबरदस्ती सोबत घेऊन गेला होता. बराच वेळ झाला तरी ती न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती, नंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली होती.










