माजी सैनिकाच्या हत्येने खळबळ, गळा चिरुन मृतदेह पुलाखाली टाकला; नेमकं कारण काय?
Crime News : सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या एका माजी सैनिकाचा नात्यातील व्यक्तीकडूनच अंत होईल असे कोणालाही वाटले नव्हते. जम्मूमध्ये माजी सैनिक बलबीर सिंह यांची झालेली खळबळजनक हत्येचा आता उलगडा झाला असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
माजी भारतीय जवानाच्या हत्येने खळबळ
गळा चिरुन मृतदेह पुलाखाली टाकला
नेमकं कारण काय?
Crime News : सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या एका माजी सैनिकाचा नात्यातील व्यक्तीकडूनच अंत होईल असे कोणालाही वाटले नव्हते. जम्मूमध्ये माजी सैनिक बलबीर सिंह यांची झालेली खळबळजनक हत्येचा आता उलगडा झाला असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादाचा वचपा काढण्यासाठी खुद्द बलबीर यांच्या मेव्हण्यानेच आपल्या एका साथीदारासह मिळून ही थरारक हत्या केल्याचे जम्मू पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हत्येचा हा कट इतका नियोजनबद्ध होता की, सुरुवातीला पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते, मात्र तांत्रिक तपासाने गुन्हेगारांचे पितळ उघडे पाडले.
हे ही वाचा : ग्रामीण पुण्यात बेपत्ता तरुणाची निर्घृणपणे हत्या, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ
भररस्त्यात गळा चिरला
सोमवारी (16 मार्च) रात्री साडे नऊच्या सुमारास चठ्ठा ते मीरा साहिब मार्गावरील एका पुलाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत बलबीर सिंह यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने इतका खोलवर वार करण्यात आला होता की, प्रचंड रक्तस्त्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एसएसपी जोगिंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली. मृतदेहाची अवस्था पाहून ही हत्या आकस्मिक नसून पूर्ण नियोजनाने केली असल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर आले होते.
सीसीटीव्ही फुटेज आणि मेव्हण्याचा डाव
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका स्कूटीवर दोन संशयास्पद व्यक्ती बलबीर सिंह यांचा पाठलाग करताना दिसल्या. याच धाग्यावरून पोलिसांनी तांत्रिक आणि मानवी गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने तपास केला आणि अवघ्या 24 तासांत देवेंद्र सिंह आणि त्याचा मित्र रविंदर सिंह ऊर्फ फतेह यांना बेड्या ठोकल्या. मुख्य आरोपी देवेंद्र सिंह हा मृताचा सख्खा मेव्हणा निघाला. त्याने आपला मित्र रविंदर, जो व्यवसायाने मांस विक्रेता आहे, त्याला या कटात सामील करून घेतले होते. हत्येसाठी रविंदरच्या दुकानातील धारदार सुऱ्याचा वापर करण्यात आला होता.










