दिलीप कुमार यांचा हॉस्पिटलमधला फोटो आला समोर, सायरा बानोंनी शेअर केला फोटो
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. दरम्यान दिलीप कुमार यांचा हॉस्पिटलमधील फोटो त्यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी सोशल मिडीयावर शेअर […]
ADVERTISEMENT
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. दरम्यान दिलीप कुमार यांचा हॉस्पिटलमधील फोटो त्यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
ADVERTISEMENT
Latest. An hour ago. pic.twitter.com/YBt7nLLpwL
— Dilip Kumar (@TheDilipKumar) June 7, 2021
दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे.. या फोटोमध्ये त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो त्यांची काळजी घेताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच कलाकारांनी देखील कमेंट करत ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.
हे वाचलं का?
९८ वर्षांचे दिलीप कुमार यांना त्यांना बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काल ट्वीट करत सायना बानो यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. “दिलीप कुमार साहब यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना उद्या ह़ॉस्पिटलमधून डिसचार्ज मिळणार आहे,” असे सायरा बानो म्हणाल्या.दिलीप कुमार यांचे नेहमीच काही रूटिन चेकअप होत असतात. तर, याच कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली. आता चाहते ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT