D Gukesh : गर्लफ्रेंड आहे का? प्रश्न विचारताच गालात हसला, उत्तर देताना गुकेश काय म्हणाले?
लोकांना या तरुण ग्रँडमास्टरच्या कौटुंबिक जीवनाबद्दल देखील जाणून घेण्याची भरपूर इच्छा दिसतेय. गुकेशचा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. एकदा गुकेशला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारण्यात आला तेव्हा त्यानं अतिशय निरागसपणे उत्तर दिले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

डी. गुकेशला प्रेयसी आहे का?

गर्लफ्रेंडबद्दलच्या प्रश्नावर तो काय म्हणाला?
World Champion D Gukesh : वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी विश्वविजेता बनत गुकेशने इतिहास रचला आहे. बुद्धिबळातील सर्वात तरुण विश्वविजेता म्हणून त्यानं मान मिळवला आहे. त्याने 14 गेमच्या अंतिम सामन्यात लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावलं. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वविजेता बनण्याचा मान मिळवणारा गुकेश हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. गुकेश वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना लागली आहे. लोकांना या तरुण ग्रँडमास्टरच्या कौटुंबिक जीवनाबद्दल देखील जाणून घेण्याची भरपूर इच्छा दिसतेय. एकदा गुकेशला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारण्यात आला तेव्हा त्यानं अतिशय निरागसपणे उत्तर दिले. गुकेशचा तो जुना व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा >>CM Revanth Reddy on Allu Arjun : "अल्लू अर्जून गाडीवर उभं राहून...", अल्लू अर्जूनच्या अटकेवर काय म्हणाले मुख्यमंत्री?
चेसबेस इंडियाशी बोलताना डी गुकेशला जेव्हा विचारण्यात आलं की, त्याची गर्लफ्रेंड आहे का? यावर 18 वर्षांचा गुकेश गालात हसला. त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू दिसलं. उत्तर देतात की, नाही... सध्या कोणीच नाही. यानंतर गुकेशला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला की, गर्लफ्रेंडमुळे त्याच्या खेळावर परिणाम होईल का? या प्रश्नाच्या उत्तरात गुकेश म्हणतो की कदाचित, त्यामुळे बुद्धिबळापासून दूर जाऊ शकतो. मी त्याचा फारसा विचार करत नाही. याबद्दल विचार करण्याचं हे योग्य वय आहे असं मला वाटत नाही.'
कमी वयात विश्वविजेता होण्याचा रेकॉर्डही मोडला...
हे ही वाचा >> Allu Arjun Released : रात्रभर तुरूंगात राहिल्यानंतर आज पहाटे अल्लू अर्जून तुरूंगाबाहेर, वकील म्हणाले...
डी गुकेशने बुधवारी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत गतविजेत्या डिंग लिरेनचा पराभव केला. दोन्ही खेळाडू 13 गेमनंतर 6.5-6.5 गुणांसह बरोबरीत होते. 14 वा गेम निर्णायक ठरला. डी गुकेशने 14व्या गेममध्ये खास चाल चालवत विजय मिळवला. गुकेशने गॅरी कास्पारोव्हचा सर्वात तरुण विश्वविजेता होण्याचा विक्रम मोडला. रशियाचा गॅरी कास्पारोव्ह वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्यांदाच वर्ड चॅम्पियन बनला होता.