उत्तराखंड दुर्घटनेवर अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली की,…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रविवारी उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळला. या दुर्घटनेला 24 तास उलटून गेले असून यामध्ये एकूण 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 150 हून अधिक जणं अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान या दुर्घटनेनंतर अनेक कलाकारांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे.

ADVERTISEMENT

तर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनेही या दुर्घटनेतील एक व्हिडीयो शेअर करत लिहीलंय, “जवानांनी ज्या पद्तीने काम करत लोकांना वाचवलंय ते पाहून मनाला फार चटका बसलाय. निसर्ग आपल्याला त्या गोष्टी परत करतो ज्या आपण त्याच्यासोबत केल्या आहेत.” तापसीचं हे ट्विट सोशल मिडीयावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

हे वाचलं का?

तर तापसीसोबत अभिनेता अजय देवगण सोनू सूद, श्रद्धा कपूर, या सेलिब्रिटींनी दुर्घटनेवर दुःख व्यक्त केलंय. अजय देवगण म्हणतो, “ही घटना भीतीदायक आहे. या कठीण प्रसंगात उत्तराखंडमधील लोकांच्या सोबत माझ्या प्रार्थना आहेत. अधिकाअधिक लोकांपर्यंत मदत पोहोचेल याची आशा करतो.”

तर श्रद्धा कपूर म्हणते, “उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळ्याची बातमी ऐकल्यापासून माझं मन विचलित झालंय. सगळे लोक सुखरुप असावेत हीच प्रार्थना करते.” हिमालयांमधील नद्यांवर जी धरणं बांधण्यात आली आहेत त्यामुळे हे सर्व घडलंय. चमोलीच्या लोकांसाठी मी मनापासून प्रार्थना करते, असं दिया मिर्झाने म्हटलंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

रविवारी उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर आयटीबीपीचे २०० हून अधिक जवान घटनास्थळी दाखल झाले होते. ही संपूर्ण दुर्घटना लक्षात घेऊन प्रशासनाने हरिद्वार, ऋषिकेश आणि श्रीनगरमध्ये अलर्ट जारी केला होता. दुर्घटनेची भीषणता लक्षात घेऊन येथील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धौली गंगा नदीच्या किनारी असलेल्या गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT