आदिपुरूषच्या कमाईत घसरण,चौथ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

मुंबई तक

ADVERTISEMENT

adipurush box office collection day 4 prabhas kriti sanon saif ali khan on raut
adipurush box office collection day 4 prabhas kriti sanon saif ali khan on raut
social share
google news

Adipurush Box office Collection : प्रसिद्ध अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आदिपुरूष (Adipurush) सिनेमाची देशभरात चर्चा आहे. सिनेमाच्या रीलीजनंतर पात्रावरून किंवा संवादावरून वाद झाल्यानंतर देखील सिनेमाने पहिल्याच आठवड्यात बक्कळ कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी हा सिनेमा अक्षरश पडला आहे. या सिनेमाने सोमवारी अवघ्या 16 करोड रुपयाची कमाई केली आहे. आदिपुरुषच्या हिंदी वर्जनमध्ये हा फरक दिसून आला आहे. (adipurush box office collection day 4 prabhas kriti sanon saif ali khan on raut)

आदिपुरुष (Adipurush) सिनेमाची ओपनिंग 65-70 करोड रूपयांपर्यत होईल असा अंदाज होता. मात्र सर्व अंदाज चुकीचे ठरवत आदिरपुरुषने पहिल्याच दिवशी भरघोस कमाई केली. सिनेमाने तब्बल 86.75 कोटीचा गल्ला कमावला. यामध्ये पहिल्याच दिवशी आदिपुरूषच्या तेलूगू वर्जनला भरघोस प्रतिसाद मिळाला. रिलीजनंतर हनुमानाच्या तोंडचे संवाद, पात्र आणि वीएफक्सवरून सिनेमाला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले. याचा परीणाम सिनेमाच्या कमाईवर होण्याची भीती होती, आणि तेच झाले. शनिवारी दुसऱ्या दिवशी आदिपुरुष सिनेमाने 65.25 करोड रूपयांचा गल्ला जमावला. पण ट्रोलिंगमुळे पहिल्या दिवसाच्या तुलनेत 20 कोटीचा तोटा झाला.

हे ही वाचा : ‘आदिपुरुष’चा लेखक मनोज मुंतशीरने घेतली मुंबई पोलिसांकडे धाव, घडलं काय?

आदिपुरूष (Adipurush) सिनेमाला तिसऱ्या दिवशी रविवारी भरघोस प्रतिसाद मिळाला. आदिपुरूष सिनेमाने तिसऱ्या दिवशी 69.1 करोड रूपयांची कमाई केली. म्हणजेच दुसऱ्या दिवसापेक्षा 4 कोटी जास्तीटची कमाई केली. या दिवशी आदिपुरुषच्या हिंदी वर्जनने 38 कोटींचा गल्ला जमवला. असा साधारण पहिल्य़ा आठवड्यात आदिपुरुष सिनेमाने 221 कोटींचा गल्ला जमवला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आदिपुरुष (Adipurush) सिनेमाने पहिल्या आठवड्यात चांगली कमाई केली. अशीच कमाई दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित होती. मात्र तसे काहीच घडले नाही. आदिपुरूष सिनेमाने सोमवारी अवघे 16 कोटी रुपयेच कमावले. आदिपुरुषच्या हिंदी वर्जनने 8.5 करोड रूपये कमावले आहेत.त्यामागे तेलुगू वर्जनने 6.9 करोड रूपये कमावले.त्यामुळे सोमवारी प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान आता आदिपुरूषने चार दिवसात 237 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर सिनेमाच्या हिंदी वर्जनने 120.75 कोटींचा गल्ला जमावला आहे.सोमवारी प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. आता हा सिनेमा किती दिवस पडद्यावग तग धरून बसतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा : ‘Adipurush’ च्या निराशाजनक कामगिरीनंतर, प्रेक्षकांचा कोणत्या चित्रपटाकडे वाढला कल? कमाईत मोठी झेप!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT