कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले अनुष्का आणि विराट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बेड्स, ऑक्सिजन तसंच औषधांचा तुटवडा जाणवतोय. या गोष्टींची कमतरता जाणवू नये यासाठी अनेक सेलेब्रिटींनी पुढाकार घेतला. तर आता अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

ADVERTISEMENT

अनुष्का आणि विराट यांनी कोरोनाग्रस्त रूग्णांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडीयो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये एका संस्थेच्या मार्फत कोरोनाबाधित रूग्णांसाठी पैसे जमा करण्याचं काम ते दोघं करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

अनुष्का आणि विराट या व्हिडीयोमध्ये म्हणतात, “सध्या आपला देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत लढतोय. या कठीण लढ्यामध्ये आपल्या आरोग्य यंत्रणाही खूप अडचणींचा सामना करतायत. आपल्याच लोकांना असं त्रासलेलं आणि ऑक्सिजनशिवाय तडफडताना पाहून आमचं मन तुटतं आहे. त्यामुळे अनुष्का आणि मी मिळून एक उपक्रम सुरू केला आहे. यात आम्ही किटो सोबत मिळून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पैसे गोळा करत आहोत.”

हे वाचलं का?

विराट आणि अनुष्काने या मोहिमेला #InThisTogether असं नावंही दिलं आहे. त्यासोबतच दोघांनी लोकांना त्यांच्या परिने पैसे दान करण्याचं आवाहन देखील केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT