Shantit Kranti Review: भन्नाट अनुभव देणारा भाडिपाचा शांतीत क्रांती
दिल चाहता है किंवा जिंदगी ना मिलेगी दोबारा हे सिनेमे पाहिल्यावर आपल्यातील कित्येकांनी त्यांना जमेल तसं गोवा किंवा परदेशात ट्रीप काढल्या.. मैत्री ही पडद्यावर अशी वेगळ्या स्वरूपातही दाखवली जाऊ शकते याचा प्रत्यय हा आपल्याला दिल चाहता है आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा पाहून पदोपदी जाणवतो ही ..मात्र तरीही आपल्या खऱ्या आयुष्यातील मित्रमैत्रिणी जे आपल्या फार […]
ADVERTISEMENT
दिल चाहता है किंवा जिंदगी ना मिलेगी दोबारा हे सिनेमे पाहिल्यावर आपल्यातील कित्येकांनी त्यांना जमेल तसं गोवा किंवा परदेशात ट्रीप काढल्या.. मैत्री ही पडद्यावर अशी वेगळ्या स्वरूपातही दाखवली जाऊ शकते याचा प्रत्यय हा आपल्याला दिल चाहता है आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा पाहून पदोपदी जाणवतो ही ..मात्र तरीही आपल्या खऱ्या आयुष्यातील मित्रमैत्रिणी जे आपल्या फार जवळचे असतात. जे आपल्याला अंर्तबाह्य ओळखत असतात त्यांचे अनुभव आपल्यासाठी नेहमीच खास असतात. नुसतीच मजा मस्ती नाही तर कधीतरी आपल्यातला खरा तो ओळखण्याची कमाल ही आपले मित्रच करून देत असतात. आणि तो आपल्या प्रत्येकासाठीच एक साक्षात्कार असतो. हाच साक्षात्कार सोनी लिववर आलेल्या शांतीत क्रांती ही सिरीज पाहून आपल्याला पुन्हा होतोय…
ADVERTISEMENT
‘भाडिपा’च्या संयुक्त विद्यमाने संस्थापक सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लिन यांनी दिग्दर्शित केलेल्या शांतीत क्रांती सिरीजची प्रेरणा जरी दिल चाहता है असली तरी यातले आमिर,सैफ आणि अक्षय खन्ना मुळातच भन्नाट आहेत.. हे तिघं म्हणजे आलोक राजवाडे,ललित प्रभाकर आणि अभय महाजन, म्हणजेच दिनार,श्रेयस आणि प्रसन्न..यातही तिघेजण आपल्या आयुष्यातील चढ-उतारांशी,वादळांशी स्पर्धा करतायत. इथेही तिघेजण गोवा ट्रीप प्लँन करतात.. मात्र ही फक्त मैत्री आणि त्यातील किस्स्यांची कथा नाहीये… तर आपल्यात लपून राहिलेल्या खऱ्या दिनार,श्रेयस आणि प्रसन्नला जागं करण्याचा एक साक्षात्कारी प्रयत्न आहे.
हे वाचलं का?
तर दिनार,श्रेयस आणि प्रसन्न हे लहानपणापासूनचे अतिशय घट्ट मित्र. तिघांचे स्वभाव वेगळे असले तरी मैत्री या तिघांना वेळोवेळी एकत्र आणतच असते. दिनार हा अतिशय मनमौजी माणूस आहे. खूप दारू पिणाऱ्या आपल्या बापाला लहानपणापासून बघत आल्यामुळे .. दिनारमध्येही जवळपास त्याच सगळ्या गोष्टी हळहळू उतरत चाल्यात. श्रेयस हा गोंधळलेला, आपल्या प्रेमासाठी पझेसिव्ह असलेला, असा एक वल्ली आहे. तर प्रसन्न हा एक स्वीमिंग ट्रेनर आहे. ज्याला आँलिपिंकमध्ये जाऊन देशासाठी पदक मिळवायचं आहे पण आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणींमुळे तो आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचत नाही. तर असे हे तीन मित्र भेटतात आणि गोव्याचा प्लँन करतात. मात्र गोव्याच्या रस्त्यावर जात असताना ते मध्येच शांतीवन या ठिकाणी जाऊन पोहचतात. इथली शिस्त, आलेले अनुभव, विचारांचं आदानप्रदान यामुळे त्यांच्या आयुष्यात पडलेल्या प्रश्नांना एकप्रकारे उत्तरं सापडायला लागतात. पण ही उत्तरं त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचू देतात का .. त्यांचं हे आत्मपरीक्षण त्यांना
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT