‘शॉर्टकटने पैसे कमावते’; शहनाजच्या विरोधात ट्विटवरून सोना महापात्रा ट्रोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Singer sona mahapatra : बॉलिवूड गायिका सोना महापात्रा (sona mahapatra) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोना महापात्राने शहनाज गिल (Shahnaz gill) हिच्याविरोधात ट्विट (Tweet) केले आहे. या ट्विटमुळे तिला ट्रोल केले जात आहे. जाणून घेऊया काय आहे अखेर प्रकरण. Singer Sona mahapatra on Shahnaz gill

ADVERTISEMENT

सोना महापात्रा शहनाज गिलवर भडकली

सोना मोहपात्रा अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जी नेहमीच आपले परखड मत मांडते. यावेळी तिने सोशल मीडियावर शहनाज गिलबद्दल मत व्यक्त केले. अलीकडेच शहनाज गिल एका कार्यक्रमात पोहोचली, जिथे तिला गाण्यासाठी विचारण्यात आले. यादरम्यान शहनाजला अजानचा आवाज आला आणि ती शांत झाली. लोकांनी शहनाजचे या कृत्याचे कौतुक केले.

हे वाचलं का?

फिल्मफेअरच्या ब्लॅक लेडीसारख्या लूकमध्ये शहनाज गिल

शहनाज गिलने बिग बॉस 16 मध्ये साजिद खानला सपोर्ट केलं होतं. सोना महापात्राने याबद्दल लिहिलं की, नॅशनल टीव्हीवर लैंगिक शोषण करणारा एक गुन्हेगार दाखवला गेला. शहनाजला शोषण झालेल्या बहिणींबद्दल काही आदर वाटेल अशी माझी इच्छा आहे. सोना महापात्राच्या या ट्विटनंतर ती इंटरनेटवर ट्रोल होऊ लागली. युजर्सचे म्हणणे आहे की, साजिद खानला सपोर्ट करण्यासाठी फक्त शहनाजलाच का टार्गेट केले जात आहे? असा सवाल केला. तर काहींनी सोना महापात्रा जळत आहे, असं लिहलं.

ADVERTISEMENT

शहनाज गिलचा हा अंदाज तुम्ही पाहिला का?

ADVERTISEMENT

स्वत:ला चारही बाजूंनी वेढलेले पाहून सोना महापात्राने पुन्हा ट्विट केले. यूजर्सना उत्तर देताना, सिंगरने लिहिले, “प्रिय ट्रोल जॅकलिनसारख्या दुसर्‍या अभिनेत्रीसाठी उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.” मला माहित नाही की शहनाजची खास प्रतिभा काय आहे? सध्या तिने टीव्ही रिअॅलिटी शोशिवाय काही केलं नाही. मला अशा महिला माहित आहेत ज्या शॉर्टकटद्वारे चांगले पैसे कमवतात, तिने थेट असं लिहून टाकलं. सोना महापात्राच्या दुसऱ्या ट्विटवर नेटकऱ्यांनी तिला घेरायला सुरुवात केली. चाहते तिला शहनाजच्या नावाने लोकप्रियता घेणे बंद करण्यास सांगत आहेत. सोना महापात्राच्या ट्विटवर शहनाज गिलची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. सिंगरच्या बोलण्याला शहनाज कसा प्रतिसाद देते हे पाहावे लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT