मिडीयामध्ये माझ्या प्रेग्नंसीच्या खोट्या बातम्या आल्या,दुसरं अपत्य होण्यासाठी अजून वेळ आहे – सपना चौधरी
सपना चौधरी हरयाणा सिनेइंडस्ट्रीची लोकप्रिय स्टार, सपनाचं स्टारडम फक्त हरियाणापुरतं मर्यादित नसून पूर्ण देशात तिचे लाखो चाहते आहेत. सपना चौधरी सध्या मुंबईत लव यू लोकतंत्र या सिनेमाचं शूटींग करण्यात बिझी आहे. रवि किशन,स्नेहा उल्लाल,इशा कोप्पीकर आणि अली असगर स्टारर या सिनेमात सपना एक आयटम सॉंग करते आहे. यासंदर्भात तिच्याशी संपर्क साधला असता तिने सिनेमातील तिच्या […]
ADVERTISEMENT
सपना चौधरी हरयाणा सिनेइंडस्ट्रीची लोकप्रिय स्टार, सपनाचं स्टारडम फक्त हरियाणापुरतं मर्यादित नसून पूर्ण देशात तिचे लाखो चाहते आहेत. सपना चौधरी सध्या मुंबईत लव यू लोकतंत्र या सिनेमाचं शूटींग करण्यात बिझी आहे. रवि किशन,स्नेहा उल्लाल,इशा कोप्पीकर आणि अली असगर स्टारर या सिनेमात सपना एक आयटम सॉंग करते आहे. यासंदर्भात तिच्याशी संपर्क साधला असता तिने सिनेमातील तिच्या आयटम साँगविषयीच माहिती दिली. आणि मिडीयामध्ये तिच्या प्रेग्नंसीवरून येणाऱ्या बातम्या या अफवा आहेत असं काही एक घडलं नाहीये असं तिने सांगितलं.
ADVERTISEMENT
सपना चौधरी म्हणते की मला माहिती आहे की माझे फँन्स माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यामुळे मिडीयाही माझ्यासंदर्भातील अनेक बातम्या लोकांसमोर आणतात. पण माझ्या प्रेग्नंसीविषयी आलेली बातमी एक अफवा आहे. सध्या मी फक्त माझ्या कामावर फोकस करत असून पुढची ५ वर्ष तरी आम्ही दुसऱ्या मुलाविषयी विचार करणार नाहीयोत. आणि जेव्हा मी खरंच असा विचार करेन तेव्हा मिडीयाला सर्वात पहिले ही बातमी देईन. ज्यामुळे त्यांना खोट्या बातम्या छापण्याची गरज पडणार नाही पुढे हसत ती म्हणाली की मी यावेळी एक नाही तर जुळ्या मुलांचा विचार करते आहे. सपना पुढे म्हणते की मी आत्तातरी मुंबईत शूटींग करते आहे. माझं या सिनेमात एक आयटम डान्स नंबर आहे. आणि माझ्या चाहत्यांना हे गाणं खूप आवडेल. या मल्टिस्टारर सिनेमाची कहाणी राजकारणावर प्रेरित आहे. लोकशाहीत भोळ्याभाबड्या लोकांना फसवून राजकीय पक्ष अनेक घोटाळे, भ्रष्टाचार करत असतात. तर अश्याभोवती फिरणारी या सिनेमाची कहाणी असणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT