PAN 2.0 : नव्या जमन्याचं नवं पॅनकार्ड, QR कोडचा काय उपयोग होणार? घरबसल्या कसा कराल अर्ज?
नवीन पॅन कार्ड आणण्याचं महत्वाचं कारण भारताला डिजिटल पद्धतीने सक्षम करणे आणि आयकर विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणणे हे आहे. PAN 2.0 उपक्रम हा एक ई-गव्हर्नन्स अंतर्गत असलेला एक प्रकल्प आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नव्या पॅन कार्डचा काय असणार फायदा?

पॅन कार्डवरील QR कोडचा उपयोग काय?

जुनं पॅन कार्ड बंद होणार?
प्रत्येकापर्यंत पॅन कार्ड आणि त्यासंबंधीत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पॅन कार्डची कार्यक्षमता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने पॅन 2.0 हा प्रकल्प सुरू केला आहे. नवीन पॅन कार्डला आता QR कोडही असणार आहे. या माध्यमातून कार्ड स्कॅन करून सर्व माहिती मिळवू शकणार आहात. QR कोड प्रणालीमुळे तुम्हाला अनेक महत्त्वाची कामं करणं सोपं होणार आहे. पॅन 2.0 प्रकल्पासाठी सरकारला अंदाजे 1435 कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे.
नवीन पॅन कार्ड आणण्याचं महत्वाचं कारण भारताला डिजिटल पद्धतीने सक्षम करणे आणि आयकर विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणणे. PAN 2.0 उपक्रम हा एक ई-गव्हर्नन्स अंतर्गत असलेला एक प्रकल्प असून, करदात्यांच्या नोंदणीकृत सेवांमध्ये परिवर्तन घडवून आणणं हा त्याचा महत्वाचा उद्देश आहे. तसंच, पॅन आणि TAN प्रणाली एका नोंदणीकृत प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित करून या प्रकल्पाच्या माध्यमातून डेटा सुरक्षित करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे.
हे ही वाचा >> ChatGPT वर गंभीर आरोप करणाऱ्या भारतीय इंजिनीअरचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह, कारण काय?
PAN 2.0 शी संबंधित तुमच्या मनातले प्रश्न
1. प्रश्न- जुनं पॅन कार्ड अवैध होईल का?
उत्तर- नाही, जुन्या पॅनकार्डवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. पण पॅन कार्डधारकांची इच्छा असल्यास ते या पॅनकार्डसाठी अर्ज करू शकतात. ही पूर्णपणे ऑनलाइन प्रक्रिया असणार आहे. अर्ज केल्यानंतर काही वेळानंतर तुमच्या नोंदणीकृत ई-मेलवर माहिती पाठवली जाते.