माजी मुख्यमंत्र्यांचा नातू जान्हवी कपूरचा बॉयफ्रेड… नेमकं काय करतो?
2018 मध्ये शिखर पहाडिया याने एंटरटेंटमेंट आणि गेमिंगचा बिझनेस सुरू केला. शिखर पहाडिया हा अत्यंत आलिशान असे आयुष्य जगतो. कोट्यवधी संपत्तीचा देखील तो मालक आहे.
ADVERTISEMENT
Janhavi Kapoor, Who is Shikhar Pahariya : बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांची लेक, बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. चित्रपटासह जान्हवीच्या पर्सनल लाईफचीही जोरदार चर्चा असते. सध्या ती लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया या तरूणाला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. मध्यंतरी दोघांच्या लग्नाच्याही चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे जान्हवीला डेट करणारा हा शिखर पहाडिया कोण आहे? ते जाणून घेऊयात. (janhavi kapoor who is shikhar pahariya daring rumours with bollywood actor janhavi kapoor bollywood news entertainment)
ADVERTISEMENT
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया नेहमीच एकत्र स्पॉट होत असतात. मध्यंतरी गणपती मिरवणूकीत ते एकत्र डान्स करतानाही दिसले होते. इतकंच नाही तर अनेक पार्ट्यामध्ये देखील ते एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे जान्हवी आणि शिखर पहाडिया रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा नेहमीच होत असते. असे असले तरी अद्याप जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी त्यांच्या नात्याबद्दल काहीच खुलासा केला नाही आहे. आता जान्हवीला डेट करणार शिखर कोण आहे ते पाहूयात?
हे ही वाचा : Mla Disqualification : सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवले, तरीही नार्वेकरांनी गोगावलेंना कशी दिली मान्यता?
कोण आहे शिखर पहाडिया?
जान्हवी कपूर आणि शिखर पडाडिया या दोघांनी एकत्र शिक्षण घेतलं आहे. तेव्हापासूनच त्यांची मैत्री असल्याची माहिती आहे. शिखर पहाडिया हा कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आहे. विशेष म्हणजे शिखर पहाडिया हा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आहे. सुशील कुमार शिंदे यांचा शिखर पहाडिया हा नातू आहे.
हे वाचलं का?
शिखर पहाडियाचे शिक्षण हे धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये झाले आहे. त्याने पदवीचे शिक्षण हे लंडनच्या रिजेंट युनिव्हर्सिटीमधून घेतली आहे. धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे एकत्रच शिक्षण झाले आहे. 2018 मध्ये शिखर पहाडिया याने एंटरटेंटमेंट आणि गेमिंगचा बिझनेस सुरू केला. शिखर पहाडिया हा अत्यंत आलिशान असे आयुष्य जगतो. कोट्यवधी संपत्तीचा देखील तो मालक आहे.
हे ही वाचा : Sharad Mohol Murder : शरद मोहोळ खून प्रकरणात पिस्तूल पुरवणारे ‘ते’ दोघे कोण?
दरम्यान 2024 या नवीन वर्षात जान्हवी कपूरचे सहा सिनेमे रिलीज होणार आहे. या सहा सिनेमांमधील चार सिनेमांची घोषणा झाली आहे, तर दोन सिनेमांची घोषणा होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे नवीन वर्षात जान्हवीसाठी सिनेमांच्या खूप संधी आहेत. या सिनेमातून ती तिच्या अभिनयाची छाप कशी सोडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT