Laapataa Ladies : 'लापता लेडीज' चित्रपटाची OSCARS मध्ये एन्ट्री! 29 चित्रपटांना टाकलं मागे, कारण...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Aamir khan laapataa ladies in Oscar 2025
laapataa ladies film in Oscar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' कारणांमुळे झाली चित्रपटाची निवड

point

आमिर खान आणि किरण रावने मानले आभार

point

आमिर खानच्या चित्रपटाने 25 चित्रपटाने टाकलं मागे

laapataa ladies Selected For Oscars 2025 : यंदा सिनेचाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या 'लापता लेडीज' चित्रपटाने यशाचं उच्च शिखर गाठलं आहे. डायरेक्टर किरण रावच्या या चित्रपटाची ऑस्कर 2025 साठी अधिकृतरित्या निवड केली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) ने निवडलेल्या 29 चित्रपटांच्या लिस्टमधून 'लापता लेडीज'ला भारताकडून ऑस्करसाठी निवडलं आहे. या लिस्टमध्ये रणबीर कपूर स्टारर अॅनिमल, प्रभास स्टारर मायथोलॉजीकल सायन्स फिक्शन 'कल्की 2898 AD', मल्ल्यालम फिल्म 'आट्टम', तसच डायरेक्टर पायल कपाडियाचा चित्रपट 'All We Imagine As Light' चाही समावेश होता. (This year, the 'Laapataa Ladies' film, which has ruled the imagination of cinephiles, has reached the pinnacle of fame. Director Kiran Rao Movie officially selected for Oscar 2025)

ADVERTISEMENT

या मल्ल्यालम चित्रपटाला भारताची ऑस्कर एन्ट्री म्हणून दावेदार मानला जात आहे. कारण या चित्रपटाने काही महिन्यांपूर्वीच कान्स फेस्टिवलचा दुसरा मोठा पुरस्कार जिंकला होता. हा चित्रपट इंटरनॅशनल क्रिटिक्सला खूप पसंत आला होता. लापता लेडीज या चित्रपटाला का निवडण्यात आलं आहे, यामागचं कारण FFI चे ज्यूरी चेअरमन जानू बरुआने सांगितलं आहे.

हे ही वाचा >> Thunderstorm in Mumbai: पहाटे 4 वाजता अचानक उडाली लोकांची झोप; मुंबईतील सर्वात थरारक Video 'तुफान' व्हायरल

'या' कारणांमुळे झाली चित्रपटाची निवड

जानू बरुआ यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, जो चित्रपट सर्व बाबतीत भारताचं नेतृत्व करत असेल, असा चित्रपट मला निवडायचा होता. विशेषत: जो चित्रपट भारताची सामाजिक व्यवस्थआ आणि संस्कृतीला दाखवतो. भारतीयता सर्वात महत्त्वाची आहे आणि लापता लेडीज अशा बाबतीत सर्वात पुढे आहे.

हे वाचलं का?

आमिर खान आणि किरण रावने मानले आभार

लापता लेडीजचे निर्माता आमिर खान प्रोडक्शनने अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून FFI ला धन्यवाद दिलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, आम्ही लापता लेडीजला लोकप्रीय करण्यासाठी आमचे प्रेक्षक, मीडिया आण फिल्म कम्युनिटीचे आभार मानतो. लापता लेडीजच्या डायरेक्टर किरण राव यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, माझ्या टीमने केलेल्या प्रचंड मेहनतीचं हे फळ आहे. त्यांच्या डेडिकेशन आणि पॅशनमुळे ही स्टोरी गाजली आहे. 

हे ही वाचा >> सावधान! सिद्धीविनायक मंदिरात प्रसाद खाताय? 'हा' धक्कादायक Video एकदा पाहाच

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT