अभिनेते महेश मांजरेकर यांना कॅन्सरचं निदान; मुंबईत पार पडली शस्त्रक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. त्यांना मूत्राशयाचा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली असून, मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

महेश मांजरेकर यांना मूत्राशयाचा कर्करोग झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. या वृत्ताला महेश मांजरेकर यांनी दुजोरा दिला आहे. ‘आज तक’शी बोलताना महेश मांजरेकर यांनी शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली.

महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचं निदान झालं आहे. त्यांच्यावर मुंबईतील एच.एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून, त्यांना घरीही सोडण्यात आलं आहे. शस्त्रक्रिया झाली असून, आपण प्रकृती सुधारत असल्याचं मांजरेकर यांनी म्हटलं आहे. १० दिवसांपूर्वी महेश मांजरेकर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते.

हे वाचलं का?

महेश मांजरेकर यांच्या कामाची नेहमीच चर्चा होते. त्यांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेतील चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठीतही अनेक लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेलं आहे.

मराठीतील नावलौकिक मिळालेला दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर यांच्याकडे बघितलं जातं. याशिवाय, बॉलीवूडमध्येही महेश मांजरेकर हे नाव सुपरिचित आहे. ‘वॉन्टेड’, ‘रेडी’, ‘दबंग’, ‘जिंदा’, ‘मुसाफिर’ आणि ‘काँटे’ यासारख्या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर यांनी ‘व्हाईट’ या चित्रपटाची घोषणा केली होती.

ADVERTISEMENT

महेश मांजरेकर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने ‘व्हाईट’ या सिनेमाची घोषणा केलेली असून, यासोबतच ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. तसंच बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनला पुढच्या महिन्यात सुरुवात होणार असल्याचं वृत्त आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार की अन्य कुणी याचीही चर्चा सुरू झाली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT