छिछोरे फेम अभिलाषा पाटील यांचं कोरोनामुळे निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाचा कहर वाढतच जाताना दिसतोय. दिवसेंदिवस रूग्णसंख्येतही प्रचंड वाढ होतेय. कोरोनामुळे अनेक कलाकरांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे. अशातच मराठमोळ्या अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं करोनाने निधन झालं आहे. त्या 47 वर्षांच्या होत्या.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी कामानिमित्त अभिलाषा वाराणसीला गेल्या होत्या. त्यानंतर त्यांना ताप आल्याचं जाणवलं. त्यावेळी कोरोना चाचणी केली असता चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडत गेली आणि 5 मे रोजी त्यांचं निधन झालं. अभिलाषा यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

RLD अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचं कोरोनाने निधन

हे वाचलं का?

अभिलाषा यांनी ‘बायको देता का बायको’, ‘मलाल’, ‘प्रवास’ यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. केवळ मराठीच नाही तर ‘छिछोरे’, ‘गुड न्यूज’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या बॉलिवूडच्या सिनेमांमध्येही काम केलं आहे. सुशांत सिंग राजपूतच्या छिछोरे सिनेमात त्यांनी डॉक्टरांची भूमिका केली होती.

अभिलाषा पाटील यांच्या निधनाचा अनेकांना धक्का बसला आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील, संजय कुलकर्णी तसंच अतुल तोडणकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून अभिलाशा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT