अभिनेता राजकुमार रावची फसवणूक; ‘पॅन कार्ड’चा वापर करून परस्पर काढले पैसे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बदलत्या जीवनशैलीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड वाढला आहे. आर्थिक देवाण-घेवाणीसाठी डिजिटल स्वरूपातील व्यवहार वाढले आहेत. मात्र, त्याचबरोबर सायबर क्राईमच्या घटनाही वाढल्या आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत कुणाला ना कुणाला आर्थिक फसवणुकीचा अनुभव येताना दिसत आहे. अभिनेता राजकुमार रावचीही अशाच प्रकारे आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

अभिनेता राजकुमार रावने ट्विट करून याची माहिती दिली. त्याचबरोबर यासंदर्भात कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

राजकुमार रावने सोशल मीडियातून त्याची फसवणूक झाल्याची माहिती दिली. फ्रॉड अलर्ट असं म्हणत राजकुमार राव म्हणाला, माझ्या पॅन कार्डचा गैरवापर करण्यात आला आहे. त्यांच्या नावावर कुणीतरी २५०० रुपयांचं कर्ज घेतलं आहे. त्यामुळे माझ्या सीबील वर परिणाम झाला आहे. सीबीलला माझी विनंती आहे की, या प्रकरणाची चौकशी करावी आणि असं केल्याप्रकरणी कडक कारवाई करावी, असं राजकुमार रावने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

राजकुमार रावची फसवणूक करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही. वर्षभराच्या काळात दुसऱ्यांदा राजकुमार राव सोबत असं घडलं आहे. यापूर्वी अभिनेत्याच्या नावावर कोट्यवधी रुपये उकळण्याचा प्रयत्न झाला होता.

राजकुमार रावच्य नावावर एक फेक ईमेल आयडी तयार करण्यात आला होता. अर्जून नावाच्या व्यक्तीने तीन कोटी रुपये मागितले होते. पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने राजकुमार राव असल्याचं भासवून हनिमून पॅकेज नावाच्या एका सिनेमात काम करण्यासाठी तब्बल तीन कोटी रुपये मानधन मागितलं होतं. त्यानंतर राजकुमार रावने याबद्दल सोशल मीडियावरून माहिती दिली होती.

ADVERTISEMENT

राजकुमार राव बॉलिवूडमधील प्रभावी अभिनेता असून, त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. अलिकडेच राजकुमार रावचा बधाई दो सिनेमा आला होता. आगामी हिट, मोनिका ओ माय डार्लिंग आणि भीड चित्रपटात राजकुमार राव दिसणार आहे. त्याचबरोबर गन्स आणि गुलाब्स नावाच्या वेब सीरिजमध्येही राजकुमार दिसणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT