रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं लग्न रद्द? राहुल भट्टने केला खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.. या दोघांचं लग्न १५ एप्रिलला मुंबईत होणार असल्याच्या बातम्याही मिडियात पसरल्या.. मात्र रणबीर आणि आलियाच्या लग्नाकडे डोळे लावून बसलेल्या त्यांच्या फॅन्ससाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. १५ एप्रिलला मुंबईत आलिया आणि रणबीरचं जे लग्न होणार होतं ते आता रद्द झालं असल्याची बातमी खुद्द आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट्ट यानेच दिली आहे.. आणि राहुल भट्टच्या या दाव्याला आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनीही दुजोरा दिला आहे. आता हे लग्न सध्यातरी एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

एका न्यूज पोर्टलला राहुल भट्टने नुकताच इंटरव्हयू दिला. या इंटरव्हयूमध्ये राहुल भट्ट म्हणाला की आलिया आणि रणबीरचं लग्न आता १५ एप्रिलला होणार नाही. आलिया आणि रणबीरने आपलं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. याचं कारण देताना राहुल भट्ट या मुलाखतीमध्ये म्हणाला की आलिया आणि रणबीरच्या लग्नाची बातमी,तारीख मिडीयामध्ये लीक झाली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या दोघांनी लग्न आठवडाभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ते १५ एप्रिलला लग्न करणार होते असं राहुल भट्टने या मुलाखतीत मान्य केलं

हे वाचलं का?

मग आता आलिया आणि रणबीरचं लग्न कधी होणार.. या प्रश्नावर राहुल भट्टने उत्तर दिलं की आता ते दोघं ठरवून मिडियाला लग्नाची तारीख कळवतील.. माझ्या माहितीनुसार लवकरच दोघं लग्नाची नवीन तारीख जाहीर करतील .. मात्र रणबीर आणि आलिया जास्त वेळ न घेता किमान २० एप्रिलच्या आधीच कोणतीतरी तारीख आपल्या लग्नासाठी जाहीर करतील.. मात्र १५ एप्रिलला होणारं लग्न मात्र रद्द करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT