Asha Nadkarni : ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी काळाच्या पडद्याआड
Asha Nadkarni Passed Away : हिंदी आणि मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे.
ADVERTISEMENT
Asha Nadkarni Passed Away : हिंदी आणि मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा,सून व नातू असा परीवार आहे. आशा नाडकर्णी यांच्या निधनाने आता चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. (senior actress asha nadkarni passed away work in marathi or hindi film)
ADVERTISEMENT
आशा नाडकर्णी यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला होता. सुरूवातीला आशा नाडकर्णी सोमवार पेठ येथील सारस्वत कॉलनीमध्ये राहत होत्या. त्यानंतर त्यांचे कुटुंब 1957 ला मुंबईमध्ये आले होते. तेव्हापासून आशा नाडकर्णी यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. 1957 ते 1973 ह्या कालावधीत त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपट काम केले होते. त्या उत्तम नृत्यांगणा देखील होत्या. अशा गुणी या कलाकारचे नुकतेच 19 जून 2023 ला निधन झाले. त्यांचे वय 80 वर्ष होते. त्यांच्या या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक व्हि. शांताराम यांनी ‘मौसी’ या चित्रपटात आशा नाडकर्णी यांना प्रथम अभिनेत्रीच्या रुपात काम दिले होते. त्यावेळेस त्यांचे वय अवघे 15 वर्ष होते.त्यानंतर त्यांनी ‘नवरंग’ या सिनेमातही भूमिका केली होती. व्ही. शांताराम यांनी आशा नाडकर्णी यांचे चित्रपटातील नाव ‘ वंदना’ ठेवले होते. या चित्रपटासह त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे.
हे वाचलं का?
गाजलेल्या चित्रपटांची यादी
• नवरंग – दिग्दर्शक व्हि.शांताराम 1959 – आशा नाडकर्णी,संध्या, निर्मलकुमार
• गुरु और चेला – दिग्दर्शक चांद 1973 – ज्योती, शेख मुख्तर, आशा नाडकर्णी
• चिराग – दिग्दर्शक रवि खोसला 1969 – आशा पारेख, सुनील दत्त, आशा नाडकर्णी, सुलोचना
• फरिश्ता- दिग्दर्शक केदार कपूर 1968 – देव कुमार, आशा नाडकर्णी, निवेदिता जहागिरदार
• श्रीमानजी – दिग्दर्शक राम दयाल 1968 – किशोर कुमार, आशा नाडकर्णी, शाहिदा
• दिल और मोहब्बत- दिग्दर्शक आनंद दत्ता 1968 – जाॅय मुखर्जी, शर्मिला टागोर, आशा नाडकर्णी, जाॅनी वाॅकर
• अल्बेला मस्ताना – दिग्दर्शक बी.जे.पटेल 1967 – किशोर कुमार, आशा नाडकर्णी, भगवान, अरुणा ईराणी
• बेगुनाह – दिग्दर्शक शिव कुमार 1970 – शेख मुख्तार, आशा नाडकर्णी
• श्रीमान बाळासाहेब – दिग्दर्शक दत्ता चव्हाण 1964 – राजा गोसावी,आशा नाडकर्णी
• क्षण आला भाग्याचा – दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी 1962 – राजा गोसावी,आशा नाडकर्णी
• मानला तर देव – दिग्दर्शक दत्ता चव्हाण 1970 – काशिनाथ घाणेकर, आशा नाडकर्णी
अशा अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात आशा नाडकर्णी यांनी अभिनय केला होता. त्यांच्या या निधनाने चित्रपटसुष्टीने एक चांगला कलाकार गमावल्याची भावना आता व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT