या कारणामुळे द फँमिली मँन २ वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात, सिरीजवर बंदी घालण्याची खासदाराने केली मागणी
द फँमिली मँन २ ही मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेली वेबसिरीज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झाला. मात्र आता ही वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेबसिरीजच्या ट्रेलरमध्ये दिसून आलं की तामिळ लोकांच्या विरोधात चित्रण करण्यात आल्याचा आरोप आता पुढे आला आहे. एमडीएमकेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार वायको यांनी […]
ADVERTISEMENT
द फँमिली मँन २ ही मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेली वेबसिरीज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झाला. मात्र आता ही वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेबसिरीजच्या ट्रेलरमध्ये दिसून आलं की तामिळ लोकांच्या विरोधात चित्रण करण्यात आल्याचा आरोप आता पुढे आला आहे. एमडीएमकेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार वायको यांनी याबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या वेबसिरीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या वेबसिरीजमध्ये तामिळ लोकांची प्रतिमा ही नकारात्मक दाखवल्याचा आरोप वायको यांच्याकडून करण्यात आला आहे. सध्या द फँमिली मँन च्या ट्रेलरची सोशल मिडीयावर सर्वात जास्त चर्चा आहे.
ADVERTISEMENT
फँमिली मँन २ च्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री सामंथा अक्कीनेनी राजी नावाची भूमिका करते आहे. राजी ही यात दहशतवादी दाखवण्यात आली आहे. ती सरकार विरोधात आहे. या सीरिजमध्ये चेन्नई शहराची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. तिथे श्रीकांत तिवारी राजीला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.या सीरिजमध्ये तामिळ लोक दहशतवादी आणि आयसिसचे एजंट असल्याचे आणि त्यांचा संबंध पाकिस्तानसोबत असल्याचे दाखवण्यात आल्याचे वायको यांनी म्हटलं आहे. यामुळे तामिळ समाजातील लोकांच्या भावनांना ठेच लागली आहे. हे तामिळ संस्कृतीच्या विरुद्ध आहे. तामिळनाडूमध्ये लोकांनी या सीरिजवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे आणि याच्या विरोधात आंदोलन करत आहेत असे वायको यांनी जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. याच्याआधी अनेकांनी या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तमिळ लोकांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर चुकीचे वर्णन केलं आहे. तसेच यामध्ये एलटीटीईला दहशदवादी संघटना म्हटले आहे, असा दावा अनेकांनी केला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT