Mahesh Manjrekar Exclusive Interview : कॅन्सर बरा झाल्यानंतर काय म्हणाले महेश मांजरेकर?
अभिनेते महेश मांजरेकर कॅन्सरमधून बरे झाल्यावर आता पुन्हा सज्ज झाले आहेत. मुंबई तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत महेश मांजरेकरांनी आता मी पूर्णपणे फीट आहे. आणि मला आता पूर्ण बरं वाटतंय असं सांगितलं. जी काळजी घ्यायला पाहिजे ती डॉक्टरांच्या सल्ल्याने मी घेत असून , माझ्या कामालाही सुरवात केली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. महेश मांजरेकर १९ सप्टेंबर […]
ADVERTISEMENT
अभिनेते महेश मांजरेकर कॅन्सरमधून बरे झाल्यावर आता पुन्हा सज्ज झाले आहेत. मुंबई तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत महेश मांजरेकरांनी आता मी पूर्णपणे फीट आहे. आणि मला आता पूर्ण बरं वाटतंय असं सांगितलं. जी काळजी घ्यायला पाहिजे ती डॉक्टरांच्या सल्ल्याने मी घेत असून , माझ्या कामालाही सुरवात केली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. महेश मांजरेकर १९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या मराठी बिग बॉस सिझन ३ चे महेश मांजरेकर होस्ट आहेत. नुकताच त्याचा प्रोमोही प्रदर्शित झाला. ज्यात कॅन्सरमधून बरं झालेल्या महेश मांजरेकरांचा एक वेगळाच लूक आपल्याला पाहायला मिळाला होता.
ADVERTISEMENT
महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यांच्यावर मुंबईतील एच.एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. यात त्यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली होती. त्यानंतर महेश मांजरेकर आपल्या घरीच आराम करत होते. तब्येतीत सुधारणा झाल्यावर त्यांनी कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन ३ चा प्रोमो शूट केला. आता हळूहळू ते आपल्या इतर प्रोजेक्टचंही काम सुरू करणार आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT