‘आदिपुरुष’चा लेखक मनोज मुंतशीरने घेतली मुंबई पोलिसांकडे धाव, घडलं काय?
मुंतशीरने संरक्षण देण्याची मागणी केली आहे. मनोज मुंतशीरने आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
आदिपुरुष चित्रपटावरून गोंधळ सुरूच आहे. आदिपुरुषमधील संवादांवरून देशभरात निदर्शने होत आहेत. दरम्यान, चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीरने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे. मुंतशीरने संरक्षण देण्याची मागणी केली आहे. मनोज मुंतशीरने आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. मुंतशीरच्या अर्जावर विचार करून मुंबई पोलीस सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेणार आहेत.
ADVERTISEMENT
या बद्दल सांगायचं म्हणजे प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला आदिपुरुष चित्रपट शुक्रवारी म्हणजेच 16 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र आदिपुरुषमध्ये दाखवलेल्या संवादांबाबतही देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी होत आहे. रामायणावर आधारित या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत आहेत.
चित्रपटातील या संवादांवरून होतोय गदारोळ
1- हनुमान लंकेत गेल्यावर एक राक्षस पाहतो आणि विचारतो की, ”ये लंका क्या तेरी बुआ का बगीचा है, जो हवा खाने चला आया.”
२- सीतेला भेटल्यानंतर हनुमानाला लंकेत राक्षस पकडतात, तेव्हा मेघनाथ हनुमानाच्या शेपटीला आग लावतो आणि म्हणतो, ‘जली.’ त्याला हनुमान म्हणतात, ”तेल तेरे बाप का. कपड़ा तेरे बाप का. और जलेगी भी तेरे बाप की.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> शिंदे-ठाकरेंची मोर्चेबांधणी, पण हर्षवर्धन जाधवांमुळे होणार ‘करेक्ट कार्यक्रम’?
3- जेव्हा हनुमान लंकेहून परत येतात आणि प्रभू राम विचारतात काय झाले? त्यावर उत्तर देताना हनुमान म्हणतात, “बोल दिया, जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे.”
4- लक्ष्मणावर हल्ला करताना इंद्रजित एका ठिकाणी म्हणतात, ”मेरे एक सपोले ने तुम्हारे इस शेष नाग को लंबा कर दिया. अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है.” याशिवाय काही संवाद आणि राम, सीता, हनुमान आणि रावण यांच्या वेशभूषेवरही प्रेक्षकांनी आक्षेप घेतलेला आहे.
चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी
आदिपुरुष चित्रपटाला देशभरातून विरोध होत आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप चित्रपट निर्मात्यांवर होत आहे. धर्मगुरूही या चित्रपटाविरोधात उघडपणे उतरला असून, बंदीची मागणी करत आहे. एवढेच नाही तर भाजपसह सर्वच राजकीय पक्षांचे नेतेही या चित्रपटाला विरोध करत असून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यावर केंद्र सरकारकडूनही कडक टीका करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, कोणाच्याही भावना दुखावण्याची परवानगी नाही.
ADVERTISEMENT
निर्माता संवाद बदलण्यास तयार
आदिपुरुष चित्रपटाच्या संवादांबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याचे पाहून निर्मात्यांनी ते बदलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीरने आज तकशी संवाद साधत वादावर आपली बाजू मांडली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Manisha Kayande: ‘आमदारकीसाठी मी उद्धव ठाकरेंच्या मागे लागली नव्हती, त्यांनीच…’, सगळंच सांगितलं!
मनोज मुंताशीर म्हणाला, “प्रभू श्रीरामांची सनातन कथा मुलांपर्यंत पोहोचवणे हे चित्रपटाचे ध्येय आहे. जे करायला हवं होतं ते हा चित्रपट करत आहे. मुलांनी त्यांचे खरे नायक जाणून घेतले पाहिजे. आम्ही अशा युगात आहोत जिथे एक्सपोजर खूप जास्त आहे. हॉलीवूडमधील पात्र मुलांच्या हृदयावर आणि मनावर राज्य करत आहेत. मुलांना हल्क आणि सुपरमॅन माहित आहे पण हनुमान आणि अंगद माहित नाही. आमची आदर्श मुलांपर्यंत पोहोचली पाहिजेत, असा आमचा प्रयत्न होता. तरुण वर्गानेही हा चित्रपट पाहावा.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT