Horoscope In Marathi: सुखकर गोष्टी घडतील तर काहींवर राहील संकटाचं सावट! वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope in Marathi 28 September 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलेलं आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याचं वर्णन केलं जातं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं
आज कोणत्या राशींना लाभ होणार?
कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागणार?
Horoscope in Marathi 28 September 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलेलं आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याचं वर्णन केलं जातं. 28 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्या राशींना लाभ होणार आहे आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागणार आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या... (astrology horoscope in marathi today 28 september 2024 aajche rashi bhavishya)
ADVERTISEMENT
मेष राशी
28 सप्टेंबरच्या दिवशी मेष राशींच्या लोकांच्या प्रेम प्रकरणात आनंदाची घटना घडेल. एखादा पाहुणा घरी येण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत चिंता करू नका. काही लोकांसाठी दूरच्या प्रवासाचा योग आहे.
हे वाचलं का?
वृषभ राशी
आजच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांना आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. परंतु, गंभीर समस्या नसणार आहे. लोकांना खूश करण्यासाठी स्वत: तणावात राहू नका. तुम्ही तुमच्या पार्टनरला खूश करण्याचा पूर्ण प्रयत्न कराल.
ADVERTISEMENT
मिथुन राशी
ADVERTISEMENT
28 सप्टेंबरच्या दिवशी मिथुन राशीच्या काही विद्यार्थ्यांना अभ्यासात सुधारणा झाल्याचं पाहायला मिळेल. उद्योगधंद्यात तुमचं नुकसान झालं असेल, तर मेहनत करण्यासाठी तयार राहा. पार्टनरला खूश करण्यासाठी रोमॅन्टिक क्षणांची संधी मिळू शकते.
कर्क राशी
28 सप्टेंबरच्या दिवशी कर्क राशीवाले टेन्शनच घेऊ नका. आता काही नवीन करण्याची वेळ आली आहे. तुम्ही स्वत:वर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नका. एक नवीन प्रवास तुमची वाट पाहत आहे.
सिंह राशी
आजच्या दिवशी सिंह राशीच्या व्यक्तींनी सर्व कामं जबाबदारीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. काही वेळासाठी छंद जोपासा. तुमच्याकडे दुसरा विकल्प नाही, असा विचार करू नका.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस आनंदाचा जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीकडून खूप चांगलं सरप्राईज मिळू शकतं. मानसिक आरोग्यावर लक्ष द्या. नातेसंबंध जोपासणं कधी कधी कठीण होऊ शकतं.
तुळा राशी
तुळा राशीच्या लोकांनी आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमचं जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. आज कोणतीही संधी हातातून घालवू नका. लव्ह लाईफच्या बाबतीत एखाद्या गोष्टीमुळं नाराज राहू शकता.
वृश्चिक राशी
28 सप्टेंबरच्या दिवशी तुमच्या संपत्तीच्या समस्या सुटतील. काही लोकांना प्रमोशन मिळू शकतं. विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत खूप मेहनत घेण्याची गरज आहे.
धनु राशी
या राशीच्या लोकांना उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. आयुष्यात समतोल राखणं आवश्यक आहे. खर्चाचं बजेट बनवण्याचा एक चांगला दिवस आहे. कौटुंबीक वादविवाद मिटतील.
मकर राशी
या राशीच्या लोकांना उत्सव साजरा करण्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्याकडे अनेक चांगले विकल्प येणार आहेत. तुम्ही जे काही मिळवलं आहे, त्यावर फोकस करा. व्यावसायीक जीवनात यश मिळू शकतं.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. संपतीबाबत एखादी समस्या टेन्शन देऊ शकते. कार्यालयात कौशल्य दाखवण्याची गरज असेल.
मीन राशी
आजच्या दिवशी तुमच्याकडे चांगली डील येऊ शकते. सकारात्मक विचार आत्मसात करा. मनात एखादा वाईट विचार आला तर दुर्लक्ष करा. जीवनाता सकारात्मक राहा.
टीप - राशी भविष्याबाबत दिलेल्या माहितीची मुंबई तक पुष्टी करत नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT