Kitchen Tips: अंडी दिर्घकाळ ताजी ठेवण्यासाठी काय कराल? फक्त 'या' सोप्या ट्रिकचा वापर करा 

मुंबई तक

ADVERTISEMENT

How To Keep Eggs Fresh For Longer
How To Store Eggs
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अंडी दिर्घकाळ ताजी कशी ठेवायची?

point

अंडी ताजी आणि फ्रेेश ठेवण्यासाठी 'या' ट्रिक्सचा वापर करा

point

अंड्यानं ताजं ठेवण्यासाठी सोप्या टीप्स कोणत्या?

Easy Tips To Store Eggs : अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळेच आरोग्य तज्ज्ञ सकस आहारात अंड्यांचा समावेश करतात. विशेषत: हिवाळ्यात लोकं अंड्यांचं सेवन जास्त करतात. अंडी खाल्ल्याने तुम्हाला प्रथिनं मिळतात. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी डाएटमध्ये अंड्याचा समावेश करणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु, अंड्यांची योग्य काळजी घेतली नाही, तर ती अंडी खराब होऊ शकतात. पण तुम्ही एका सोप्या ट्रिकला फॉलो केलं, तर अंडी फ्रेश आणि ताजी राहू शकतात. खाण्याच्या इतर सामानाप्रमाणे यांनाही योग्य पद्धतीने स्टोअर करणं खूप आवश्यक आहे. अंडी सडू नयेत यासाठी आम्ही तुम्हाला सोप्या टीप्सबाबत माहिती देणार आहोत. अंडी चांगल्या पद्धतीत स्टोअर केल्यावर ती दिर्घकाळ चांगली राहू शकतात. 

ADVERTISEMENT

अंडी स्टोअर करण्याची योग्य पद्धत कोणती?

प्रसिद्ध शेफ रणवीर बरार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. या व्हिडीओत शेफ म्हणतात, लोकं बाजारातून अंडी घेऊन येतात आणि त्यांना फ्रिजमध्ये चुकीच्या पद्धतीने स्टोअर करतात. परंतु, त्यांना दिर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी अंड्यांना योग्य पद्धतीत ठेवण्याची आवश्यकता आहे. 

हे ही वाचा >> Kitchen Tips: फ्रिज नसतानाही दूध राहील फ्रेश, अजिबात नाही फाटणार, फक्त...

शेफ रणवीरने दिलेल्या माहितीनुसार, 'जर तुम्हाला जास्त दिवस अंड्यांना ताजं ठेवायचं असेल, तर यासाठी एग ट्रेमध्ये अंड्याच्या पातळ भागाला खाली ठेवा आणि जाड भाग वरच्या बाजूला ठेवा'.

हे वाचलं का?

डाएटिशियन आणि सर्टिफाईड डायबिटीज एज्युकेटर कनिका मल्होत्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटलं, अंड्याच्या पातळ भागाला खाली आणि जाड भागाला वरच्या बाजूला ठेवल्याने ते जास्त दिवस फ्रेश राहतात. कारण अंड्याच्या वरच्या भागात एयर सेल असतं. अंड्याला जास्त दिवस झाले की, ही एयर सेलही हळूहळू मोठी होते. पण जेव्हा तुम्ही अंड्याच्या या मोठ्या भागाला वरच्या बाजूला ठेवता, त्यावेळी यात असलेल्या एअर सेल वाढण्याची गती मंदावते. असं केल्याने एअर सेलला खूप वेगानं पसरण्यास रोखू शकतो. यामुळे अंड्यांमध्ये नैसर्गिकरित्या थंडावा राहतो आणि ते लगेच खराब होत नाहीत. 

हे ही वाचा >>  Optical illusion IQ Test : चित्रात सुंदर निसर्ग दिसतोय? पण 'तो' निसर्ग नाही, जरा क्लिक करून नीट बघा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT