Gold Price Today : दहीहंडीआधी सोनं झालं स्वस्त, आजचा भाव काय?
Gold Price Today : देशातील 12 मोठ्या शहरांमध्ये सोने 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सराफा बाजारानुसार, आज शनिवार, 24 ऑगस्ट 2024 रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. काल शुक्रवारी सोने 500 रुपयांनी स्वस्त झाले होते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण
सोन्याचा आजचा भाव काय आहे?
Gold Price Today : अवघ्या दोन दिवसांवर दहीहंडी (Dahi Handi) हा सण येऊन ठेपला आहे. या सणाआधी सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या (Gold Price) दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. शुक्रवारी देखील सोने किंचित स्वस्त झालं होतं. त्यानंतर आज देखील सोनं स्वस्त झालं आहे. त्यामुळे सोन्याचा आजचा भाव काय आहे? हे जाणून घेऊयात. (gold price today on saturday 24 august before janmashtami gold and silver rate know the details)
ADVERTISEMENT
देशातील 12 मोठ्या शहरांमध्ये सोने 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सराफा बाजारानुसार, आज शनिवार, 24 ऑगस्ट 2024 रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. काल शुक्रवारी सोने 500 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यामुळे तुम्ही जर दहीहंडी या सणानिमित्त आणि लग्नानिमित्त सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. देशातील 12 मोठ्या शहरांमध्ये सोने 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सराफा बाजारानुसार, आज शनिवार, 24 ऑगस्ट 2024 रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. काल शुक्रवारी सोने 500 रुपयांनी स्वस्त झाले.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांच्या खात्यात पुन्हा 3000 होणार जमा, सरकारने घेतला मोठा निर्णय
24 कॅरेट सोन्याचा भाव बहुतांश शहरांमध्ये 72,700 रुपयांच्या आसपास आहे. त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,500 रुपयांच्या आसपास आहे. जर आपण चांदीबद्दल बोललो तर दिल्लीत चांदीचा दर 86,600 रुपये होता. काल, शुक्रवार, 23 ऑगस्टच्या तुलनेत आज चांदीचा दर 300 रुपयांनी कमी झाला आहे. देशातील 12 शहरांमधील सोन्या-चांदीचे दर जाणून घेऊया.
हे वाचलं का?
देशभरातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 72,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 66,740 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
ADVERTISEMENT
अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत 66,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान दिल्लीच्या स्थानिक सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 350 रुपयांनी घसरून 73,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार, गेल्या ट्रेडिंग सत्रात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 74,150 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीचा भावही 200 रुपयांनी घसरून 87,000 रुपये प्रति किलोवर बंद झाला, तर मागील बंद भाव 87,200 रुपये प्रति किलो होता.
हे ही वाचा : Viral: ...अन् नको ते घडलं, जाहिरात फलकावर सुरू झाला अश्लील सिनेमा
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT