UPI लॉन्च करणार नवा टॅप-टू-पे फिचर! यूजर्सना होणार कोणता फायदा?
फाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. आता हे प्लॅटफॉर्म 31 जानेवारी 2024 पर्यंत टॅप टू पे फिचर लॉन्च करण्याची शक्यता आहे. हे फिचर लॉन्च होताच कॉन्टॅक्ट फ्री ट्रानजॅक्शन करणं शक्य होणार आहे.
ADVERTISEMENT
UPI Tap-to-Pay Feature : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे डिजिटल पेमेंट (Digital Payment) प्लॅटफॉर्म आहे. आता हे प्लॅटफॉर्म 31 जानेवारी 2024 पर्यंत टॅप टू पे फिचर लॉन्च करण्याची शक्यता आहे. हे फिचर लॉन्च होताच कॉन्टॅक्ट फ्री ट्रानजॅक्शन करणं शक्य होणार आहे. हे फिचर नियर फील्ड कम्युनिकेशन तंत्रज्ञान वापरून काम करेल. तसंच NFC इनेबल्ड स्मार्टफोन आणि NFC इनेबल्ड टर्मिनलला सपोर्ट करेल. (UPI will launch a new tap-to-pay feature What will be the benefit to the users)
ADVERTISEMENT
UPI पेमेंटच्या नवीन पद्धती कशा असणार?
UPI टॅप-टू-पे कॉन्टॅक्ट फ्री पेमेंट करण्यासाठी NFC तंत्रज्ञानाचा वापर करते. यूजर्स त्यांचे UPI-लिंक केलेले बँक अकाउंट त्यांच्या स्मार्टफोनवर (किंवा वेअरेबल टूल्स) सुरक्षितपणे स्टोअर करू शकतात. NFC-इनेबल्ड टर्मिनलवर, आतापर्यंत वापरलेल्या एंटर पिन सिस्टीमऐवजी एक साधं टॅप ट्रानजॅक्शन सुरू होईल.
वाचा : हाजी मलंग दर्गा की मंदिर?, राजकारण का तापले? नेमका त्याचा इतिहास काय?
टॅप-टू-पे फिचरचे फायदे
- सोयीस्कर आणि झटपट पेमेंट करणं शक्य- झटपट पेमेंटमुळे लांबलचक रांगा आणि वेटिंग टाइम दूर होईल. यूजर्स आणि व्यापारी दोघांनाही एक सोपा पेमेंट अनुभव मिळेल.
- सुरक्षित व्यवहार- यूजर्सच्या UPI पिनद्वारे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनसह ट्रानजॅक्शन सुरक्षितपणे केले जाईल. एक सुरक्षित आणि विश्वासार्ह पेमेंट अनुभव मिळेल.
वाचा : हॉटेलमध्ये मालकासोबत एन्ट्री नंतर चादरीत गुंडाळलेला मृतदेह… मॉडेल दिव्या हत्याकांडाचं गँगस्टर कनेक्शन?
टॅप-टू-पे फिचरचा वापर करण्यापूर्वी आवश्यक अटी
या फिचरचा लाभ घेण्यासाठी, यूजर्सकडे NFC तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला आणि त्यांच्या UPI अकाउंटशी जोडलेला स्मार्टफोन किंवा वेअरेबल असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, टॅप-टू-पे फंक्शन अॅक्टिव्ह करण्यासाठी सध्याचे UPI अॅप अपडेट करणे आवश्यक असू शकते. बँका आणि व्यापारी त्यांचे POS टर्मिनल NFC रीडरसह सुसज्ज करून या तांत्रिक बदलासाठी सक्रियपणे तयारी करत आहेत.
हे वाचलं का?
वाचा : Jitendra Awhad : पवारांच्या दोन नेत्यांमध्ये ठिणगी; आव्हाडांचं रोहित पवारांना खरमरीत उत्तर
Autopay सारख्या इतर लोकप्रिय फिचर्सव्यतिरिक्त, ज्याचा मोठ्या प्रमाणावर सबस्क्रिप्शन-आधारित-पेमेंटसाठी वापर केला जातो, UPI हा आंतरराष्ट्रीय पेमेंट पर्याय म्हणून संपूर्ण भारतात सक्षम करण्याच्या योजना देखील आहे. ज्यामुळे आपल्या परदेशी यूजर्ससह व्यवहार करणे शक्य होईल. UPI फसवणुकीविरूद्ध धोरण लागू करण्यासाठी देखील सज्ज आहे आणि एक वर्षापेक्षा जास्त काळ अॅक्टिव्ह नसलेले अकाउंट डीअॅक्टिव्हेट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT