Yugendra Pawar: 'बारामतीत कोणी धमकावत असेल तर मला सांगा...', युगेंद्र पवारांचं थेट अजितदादांना चॅलेंज?
Yugendra Pawar baramati: 'बारामतीमध्ये जर तुम्हाला कोणी धमकावत असेल तर थेट मला सांगा... पुढचं मी बघून घेतो..' असं म्हणत युगेंद्र पवार यांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
युगेंद्र पवार म्हणाले घाबरू नका..
बारामतीत दहशतीचं वातावरण नव्हतं...
युगेंद्र पवार काकांविरोधात उभे ठाकले!
Baramati Yugendra Pawar: वसंत मोरे, बारामती: बारामतीत दहशतीचं आणि वेगळ्या प्रकारचं राजकारण असेल तर माझ्याशी संपर्क करा, मग मी बघतो.. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी थेट अजित पवारांना आव्हान दिलं आहे.
युगेंद्र पवार आजपासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी गावभेट, दौरे करत आहेत. उंडवडीत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सर्वांनी आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
हे ही वाचा> Yugendra Pawar: शरद पवारांचा नवा डाव.. सख्खा पुतण्याच करणार अजितदादांची कोंडी, कोण आहेत युगेंद्र पवार?
शरद पवार गटासोबत जोडल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याची चर्चा सध्या बारामती सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर योगेंद्र पवार यांनी प्रस्थापितांना थेट इशारा देत असं म्हटलं की, 'बारामतीत वेगळ्या प्रकारचं राजकारण होत आहे. बारामतीकरांनी असे दहशतीचं राजकारण कधी बघितलं नाही. कोणी तुम्हाला फोन करून धमकावच असेल तर थेट माझ्याशी संपर्क करा, पुढचं मी बघतो', असं म्हणत युगेंद्र पवार यांनी थेट अजित पवार यांनाच आव्हान दिलं आहे.
बारामतीत कोण मारणार बाजी?
बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत होणार आहे. ही लढत अत्यंत रंजक होणार एवढं निश्चित.. याचबाबत जेव्हा युगेंद्र पवार यांना विचारणा करण्यात आली होती तेव्हा युगेंद्र पवार म्हणालेले की, 'बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे या पराभूत होतील, असं मला वाटतं नाही. सुप्रिया सुळे यांनी खूप कामं केली आहेत. त्यामुळे त्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, तसेच सुनेत्रा पवार बारामतीत उभ्या राहतील, असं मला वाटतं नाही. बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरूद्ध पवार लढत होईल, असे मला वाटत नाही.' असे युगेंद्र पवार म्हणालेले.










