Yugendra Pawar: शरद पवारांचा नवा डाव.. सख्खा पुतण्याच करणार अजितदादांची कोंडी, कोण आहेत युगेंद्र पवार?
Who is Yugendra Pawar: बारामतीत एका नव्याच राजकारणाला सुरुवात झाली आहे. कारण अजित पवारांना टक्कर देण्यासाठी त्यांचा सख्खा पुतण्याच आता मैदानात उतरला आहे. जाणून घ्या युगेंद्र श्रीनिवास पवार यांच्याविषयी..

ADVERTISEMENT
Yugendra Srinivas Pawar: बारामती: महाराष्ट्रात सातत्याने राजकीय भूकंप घडत आहेत. अशातच राज्यातील पवार कुटुंब हे सध्या या राजकीय भूकंपाच्या सतत केंद्रस्थानी आहेत. त्यातच आता युगेंद्र पवार या तरुण नेत्याच्या एंट्रीने बारामतीत (Baramati) एका नव्याच राजकारणाला सुरुवात झाली आहे. आता हे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) नेमके कोण आणि त्यांच्या राजकारणातील एंट्रीने नेमकी राष्ट्रवादीतील गणितं कशी बदलणार हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (will be by his nephew who is yugendra pawar)
बारामतीत काही दिवसांपूर्वीच अजित पवार म्हणाले की, "माझं कुटुंब सोडलं तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटं पाडण्यासाठी कसे काहीजण जीवचं रान करतात ते बघा', त्यांच्या या विधानाला काही दिवसही लोटले नाही तोच आता अजितदादांच्या सख्ख्या पुतण्याने म्हणजेच युगेंद्र पवार यांनी थेट आव्हान उभं केलं आहे.
पवार कुटुंबातील शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे सध्याच्या घडीला सक्रीय राजकारणात आहेत. मात्र, असं असलं तरीही संपूर्ण पवार कुटुंब हे या नाही तर त्या कारणाने राज्यातील राजकारणाशी जोडलेलं आहे. मग ते सहकार क्षेत्र असो किंवा शिक्षण क्षेत्र किंवा क्रीडा संघटना.. यामध्ये पवार कुटुंबातील एक तरी व्यक्ती असल्याचं पाहायला मिळतंय..
अशातच युगेंद्र पवार हे आता आपल्या काकांच्या बाजूने नव्हे तर आपल्या आजोबांच्या बाजूने ठामपणे उभं राहणार असल्याचं समोर आल्याने बारामतीत मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
