परभणी : ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तीन भावांचा मृत्यू, जिंतूर-जालना महामार्गावरील घटना - Mumbai Tak - 3 brothers lost life in a road accident in jintur area of parbhani - MumbaiTAK
बातम्या

परभणी : ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तीन भावांचा मृत्यू, जिंतूर-जालना महामार्गावरील घटना

परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहराजवळ ३ किमी अंतरावर असलेल्या अकोली गावाजवळील पुलावर एका ट्रकने मोटर सायकलला चिरडल्याने तीन भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी साडे नऊ वाजल्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. मयतात मालेगावातील दोन सख्ख्या भावांचा समावेश असून तिसरा मयत चुलतभाऊ असल्याचं कळतंय. या दुर्दैवी घटनेमुळे मालेगावातील मेहेत्रे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हा […]

परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहराजवळ ३ किमी अंतरावर असलेल्या अकोली गावाजवळील पुलावर एका ट्रकने मोटर सायकलला चिरडल्याने तीन भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी साडे नऊ वाजल्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. मयतात मालेगावातील दोन सख्ख्या भावांचा समावेश असून तिसरा मयत चुलतभाऊ असल्याचं कळतंय. या दुर्दैवी घटनेमुळे मालेगावातील मेहेत्रे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणी तिन्ही भावांचे छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह व त्याच्या शेजारी जेवणाचे डब्बे हे दृष्य मन सुन्न करणारं होतं.

गुजरातहून पुण्यात येणारा तब्बल 11 लाखांचा गुटखा जप्त, आळेफाटा पोलिसांची धाडसी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील अभिषेक काशिनाथ मेहेत्रे, योगेश काशिनाथ मेहेत्रे हे सख्खे भाऊ व त्यांचा तिसरा चुलत भाऊ रामा विश्वनाथ मेहेत्रे हे नेहमी प्रमाणे मालेगाव वरुन जिंतूरकडे मसाल्याच्या दुकानावर आपल्या कामानिमीत्त जात होते. आपल्या दुचाकीवरुन जात असताना अकोली पुलाजवळ जिंतूरवरुन जालन्याकडे जाणाऱ्या ट्रकने मेहेत्रे भावांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

इचलकरंजी : वस्त्रोद्योगासाठी लागणाऱ्या ऑईल निर्मितीच्या कारखान्याला आग, जिवीतहानी नाही

ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. तिन्ही भावांच्या डोक्याचा या अपघातात चेंदामेंदा झाला होता. या अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, एपीआय गंगाधर गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी साठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातामुळे परिसरात शोकाकुल वातावरण आहे.

सांगली : उसतोडणी मशिनला आग लागून दीड कोटींचं नुकसान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − one =

अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी! ‘ही’ 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान!