मुलीने अल्पवयीन मुलाला भेटायला टेरेसवर बोलावले, डेटिंगचा विषय काढताच मुलाची सटकली अन्..

मुंबई तक

Mumbai Crime News : मुंबईतील भांडूपमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका इमारतीत एकतर्फी प्रेमाच्या वादातून अल्पवयीन मुलाने आपल्याच मैत्रिणीला इमारतीच्या टेरेसवरून ढकललं. यातच तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

ADVERTISEMENT

mumbai crime
mumbai crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील भांडूपमध्ये एक धक्कादायक घटना

point

अल्पवयीन मुलानेच तरुणीला इमारतीवरून ढकललं

Mumbai Crime News : मुंबईतील भांडूपमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महेंद्र स्प्लेंडर नावाच्या एका इमारतीत एकतर्फी प्रेमाच्या वादातून अल्पवयीन मुलाने आपल्याच मैत्रिणीला इमारतीच्या टेरेसवरून ढकललं. यातच तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा : बाप नाही हैवान! दारूच्या नशेत लेकीच्या खांद्यावर कुऱ्हाडीने सपासप वार, पत्नीलाही... नेमकं घडलं काय?

नेमकं प्रकरण काय? 

मिळालेल्या घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या एका परिक्षेत संबंधित अल्पवयीन मुलाला परीक्षेत अपेक्षेहून कमी गुण मिळाले होते. यामुळे तो आधीपासूनच मानसिक दडपणात होता. तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याची चेष्टा केल्याने त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. अशा स्थितीत त्याच्या एका मैत्रिणीने त्याला एका बिल्डिंगच्या टेरेसवर भेटायला बोलावले होते. 

दोघांमध्ये बोलणं सुरू झाल्यानंतर मुलीने त्याला डेटिंगसाठी विचारले. मात्र, मुलाने आपल्या तिला डेटिंगसाठी नकार दिला होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि वादानंतर रागाच्या भरात त्या अल्पवयीन मुलाने आपल्या मैत्रिणीला बिल्डिंगच्या टेरेसवरुन ढकलून दिलं आणि त्यानंतर मैत्रिणीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात भांडूप पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

हेही वाचा : शुक्र ग्रह राशी बदलतोय, 30 जूनपासून 'या' राशीतील लोकांवर धोक्याची घंटा

या प्रकरणात अल्पवयीन मुलाविरोधात कलम 103 (1), 238 ( BNS) 2023 कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपी हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. या तपासादरम्यान या हत्येची आणखी काही कारणं समोर येण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp