Sharad Pawar: ‘…त्याशिवाय हे शक्यच नाही’, फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवर शरद पवारांनी व्यक्त केली शंका
मुंबई: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (8 मार्च) विधानसभेत सरकार वकिल प्रवीण चव्हाण यांचं एक स्टिंग ऑपरेशन समोर आणलं. ज्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण एकच राजकीय भूकंप झाला. या स्टिंग ऑपरेशनमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही काहीसा उल्लेख करण्यात आला आहे. याचबाबत आता स्वत: पवारांनी पत्रकारांना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, यावेळी पवारांनी या […]
ADVERTISEMENT
मुंबई: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (8 मार्च) विधानसभेत सरकार वकिल प्रवीण चव्हाण यांचं एक स्टिंग ऑपरेशन समोर आणलं. ज्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण एकच राजकीय भूकंप झाला. या स्टिंग ऑपरेशनमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही काहीसा उल्लेख करण्यात आला आहे. याचबाबत आता स्वत: पवारांनी पत्रकारांना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, यावेळी पवारांनी या संपूर्ण स्टिंग ऑपरेशनबाबतच शंका उपस्थित केली आहे.
ADVERTISEMENT
‘या सगळ्यात माझं नाव अप्रत्यक्ष घेतलं पण माझा काहीही संबंध नाही. पण केंद्रीय यंत्रणांचा वापर केल्याशिवाय हे शक्य नाही. फडणवीसांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपांबाबत खोलात गेलेलो नाही. या आरोपांची राज्य सरकारनं चौकशी करावी.’
‘सरकार गेल्यामुळे भाजप अस्वस्थ झालं आहे. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी केली जात आहे. याचं अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण आहे. सध्या भाजपकडून सत्ताधाऱ्यांना नाऊमेद करण्याचा प्रयत्न आहे. पण सरकारला कोणीही धक्का लावू शकत नाही. सरकार 5 वर्ष टिकेल. भाजपकडून केवळ सत्ता मिळविण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरु आहेत.’ असा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला आहे.
हे वाचलं का?
‘पेनड्राईव्ह बॉम्ब’वर शरद पवार काय म्हणाले:
‘ज्या काही गोष्टी फडणवीसांनी सांगितल्या अर्थात त्याच्या काही खोलात मी गेलेलो नाही. पण मला एका गोष्टीचं कौतुक वाटलं की, एका शासकीय वकिलाच्या कार्यालयात जवळपास 125 तासांचं रेकॉर्डिंग करण्यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे कोणी सहकारी यशस्वी झाले ही कौतुकास्पद बाब आहे. 125 तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ रेकॉर्डिंगची प्रक्रिया किती दिवस चालली असेल याचा हिशोब केला तर आपल्याला लक्षात येईल.’
ADVERTISEMENT
‘खरंच जर एवढ्या तास रेकॉर्डिंगची काम केलं असेल तर त्यासाठी एखाद्या एजन्सींचा वापर केलेला असू शकतो आणि अशा एजन्सी या फक्त भारत सरकारकडे आहेत.’
ADVERTISEMENT
‘त्यामुळे राज्य सरकारच्या एखाद्या कार्यालयात तासानतास रेकॉर्डिंग केलं गेलं असं म्हटलं जात आहे. पण ते खरं आहे की नाही हे सिद्ध झालं पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार नक्कीच चौकशी करेल आणि त्याबाबतची सत्यता आणि असत्यता पाहून घ्यावी लागेल.’
‘त्यात काही ठिकाणी माझं नाव घेतलं गेलं आहे. पण माझं कधी यासंबंधी कोणाशी बोलणं झालेलं नाही. पण एक गोष्ट खरी आहे की, माझ्याकडे गेल्या साधारण वर्षभरापूर्वी एक गंभीर तक्रार आली होती. त्यानंतर ती तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात असल्याने त्याची माहिती मी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. त्यांना हे देखील सांगितलं की, यात सत्यता किती आहे हे तुम्हीच पाहा.’
कथित स्टिंग ऑपरेशनमधील प्रचंड खळबळजनक Video, फडणवीसांच्या टार्गेटवर आता थेट शरद पवार?
‘तुमच्या सहकाऱ्यांशाबंधी ही तक्रार आहे. पण त्याची शाहनिशा केल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य नाही. म्हणून मी काही जाहीरपणाने बोलणार नाही. त्यामुळे आपण काय ते पाहून घ्या. त्यानंतर त्यांच्याकडून मला एवढंच कळवलं गेलं की, तुम्ही पाठवलेल्या लोकांच्या तक्रारीमध्ये मी लक्ष घातलं आणि अशा गोष्टी होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. हा प्रश्न माझ्या मते तिथेच संपला. त्यामुळे व्यक्तीश: माझा याच्याशी कुठेही संबंध येण्याचं कारण नाही.’ असं म्हणत शरद पवार यांनी फडणवीसांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले. जळगावमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या संबंधित प्रकरणात भाजप आमदार गिरीश महाजन यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी पोलिसांना मदत केल्याचा आरोप फडणवीसांनी विधानसभेत केला आहे.
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ आणि पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला. आपल्याकडे सव्वाशे तासांचे व्हिडीओ रेकॉर्डींग आहे. यातील काही व्हिडीओ सभागृहात दाखवले तर इभ्रत जाईल. या व्हिडीओच्या माध्यमातून २० ते २५ वेब सिरीज होतील असाही टोला फडणवीसांनी सभागृहात लगावला.
भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर २०१८ सालच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील एका वादाप्रकरणी पुणे पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केला. या प्रकरणात मोक्का लावण्यात यावा अशी कागदपत्र तयार केली. ही सर्व कारवाई विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “सरकारी वकिलांचे कार्यालय म्हणजे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं ठिकाण आहे. गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत आहे”, असं सांगून सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप फडणवीस यांनी केले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT