उस्मानाबाद : जिल्हा कारागृहात कोरोनाचा उद्रेक, १३३ कैदी कोरोनाबाधीत
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला पहायला मिळतो आहे. उस्मानाबादच्या जिल्हा कारागृहात १३३ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी ३५ तर रविवारी ९८ कैद्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. कोरोनाची लागण झालेल्या सर्व रुग्णांवर डॉक्टरांचे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. उस्मानाबाद : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी, आरोग्य यंत्रणांचं टेन्शन वाढलं कोरोनाची लागण […]
ADVERTISEMENT
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला पहायला मिळतो आहे. उस्मानाबादच्या जिल्हा कारागृहात १३३ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी ३५ तर रविवारी ९८ कैद्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. कोरोनाची लागण झालेल्या सर्व रुग्णांवर डॉक्टरांचे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
उस्मानाबाद : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी, आरोग्य यंत्रणांचं टेन्शन वाढलं
कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये ९ महिला कैद्यांचा समावेश आहे. कारागृहातील एकूण २७२ कैद्यांपैकी १३३ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कारागृह प्रशासनासमोरची चिंता अधिक वाढली आहे. दरम्यान रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे ४९२ रुग्ण आढळले तर ९ जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण कसं मिळवायचं असा प्रश्न शासकीय यंत्रणांसमोर निर्माण झाला आहे.
हे वाचलं का?
धाराशिव साखर कारखान्याने करुन दाखवलं ! इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मितीची चाचणी यशस्वी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT