Ulhasnagar च्या बालसुधारगृहातील 14 मुलं कोरोना पॉझिटिव्ह
उल्हासनगरच्या बालसुधारगृहातील 14 मुलांना कोरोना झाला आहे. यापैकी चार मुलं शारीरिक व्यंग असलेली आहेत. या मुलांचं वय 12 ते 18 वर्षे आहे. या मुलांना Covid Care सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही मुलांना ताप आणि खोकला झाला होता. त्यामुळे या […]
ADVERTISEMENT
उल्हासनगरच्या बालसुधारगृहातील 14 मुलांना कोरोना झाला आहे. यापैकी चार मुलं शारीरिक व्यंग असलेली आहेत. या मुलांचं वय 12 ते 18 वर्षे आहे. या मुलांना Covid Care सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही मुलांना ताप आणि खोकला झाला होता. त्यामुळे या बालसुधार गृहातील मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यानंतर यापैकी 14 मुलांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
14 मुलं कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बालसुधारगृहाने आरोग्य विभागाशी संपर्क साधला. गुरूवारी एका आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये 25 मुलांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातले 14 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. उल्हासनगर महापालिकेचे पीआरओ युवराज भदाणे यांनी ही माहिती दिली की 14 मुलांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर १० कर्मचाऱ्यांचीही आरटीपीसीआर टेस्ट आम्ही केली आहे. त्या टेस्टचे निकाल अद्याप यायचे आहेत.
हे वाचलं का?
26 तारखेला सेंट जोसेफ शाळेतील 22 मुलं पॉझिटिव्ह
मुंबईतल्या सेंट जोसेफ शाळेतील २२ मुलं कोरोना पॉझिटिव्ह झाली. सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूलमधल्या 12 वर्षांखालील चार मुलांना नायर रूग्णालयातल्या बालरोग विभागात दाखल करण्यात आलं. तर 11 मुलांना जे 12 ते 18 वयोगटातले आहेत. त्यांना रिचर्डसन क्रुडासमधल्ये कोव्हिड वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. मुंबईतल्या आग्रीपाडा भागात हे बोर्डिंग स्कूल आहे.
ADVERTISEMENT
देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. एक संकट दूर होत असताना आता तिसर्या लाटेच्या धोक्याबाबतही शक्यता वर्तवली जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लवकरच भारतात दिसू शकते. यासह, काही तज्ञ आणि अभ्यासकांच्या मते, तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका होण्याची शक्यता आहे. या दरम्यान मुंबईतील आगरी पाड्यातील सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूलमधील 22 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होणार हा इशारा खरा ठरणार का? असा सवाल उपस्थित आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र सणवार येत आहेत, पुढच्याच महिन्यात गणपती उत्सव आहे. हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तिसरी लाट येऊ नये म्हणून कोव्हिड प्रोटोकॉल पाळण्याचेही आवाहन वारंवार करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT