LIC Bima Sakhi Yojana : विमा सखी योजनेसाठी कोण पात्र, कोण अपात्र? लाडक्या बहिणींसाठी सविस्तर माहिती एका क्लिकवर
PM Narendra Modi यांनी सोमवारी 9 डिसेंबरला या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विमा सखी योजनेचा लाभ कुणाकुणाला होणार?

लाडक्या बहिणींना होणार का विमा सखी योजनेचा लाभ?
Vima Sakhi Yojana : LIC ने महिलांसाठी एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पुन्हा एकदा चांगलाच धनलाभ होणार आहे. कारण या योजनेतून महिलांना दरमहा किमान 7000 रुपयांचा लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 9 डिसेंबरला या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.
एका वर्षाच्या आत 1,00,000 विमा सखींना पॅनेलमध्ये समाविष्ट करणं हे या विमा सखी योजनेचं उद्दिष्ट आहे. ग्रामीण महिलांना विमा एजंट बनवून त्यांना स्वत:ला उभं करण्यासाठी आणि ग्रामीण भागात विम्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी ही खास योजना आणण्यात आली आहे. LIC विमा सखी योजनेमुळे फक्त ग्रामीण भागातच नाही, तर दुर्गम भागातील महिलांसाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.
हे ही वाचा >>Dindigul Hospital Fire : खासगी रुग्णालयाला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू, तर 20 पेक्षा जास्त रुग्णांना..
सामाजिक कल्याणाची जोड व्यवसाय वाढीशी घालून एलआयसीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी आणि आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी ही योजना आणली असून, 18 ते 50 वयोगटातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. किमान 10 वी पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं ही योजनेसाठी अट असेल. LIC महिला सक्षमीकरण मोहिमेअंतर्गत पुढील 12 महिन्यांत 1 लाख विमा सखींची आणि तीन वर्षांत 2 लाख विमा सखींची नोंदणी करण्याच्या ध्येय सध्या LIC ने ठेवलं आहे.