पुणे : पुरंदर आश्रम शाळेतील १९ मुलांना कोरोनाची लागण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रशासनाच्या चिंतेत भर घालते आहे. आज पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील निराधार मुलांसाठी चालवण्यात येत असलेल्या सार्थक अनाथाश्रमात कोरोनाने शिरकाव केला आहे. आश्रमातील तब्बल १९ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. ही सर्व मुलं सात ते नऊ वयोगटातील असल्याचं समजतंय.

ADVERTISEMENT

येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक त्रास होऊ शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यातच एका आश्रमातील १९ मुलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या सर्व मुलांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार होत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कळते आहे. पुरंदर येथील आश्रमशाळेत ७ ते १४ वयोगटातील ८४ मुलं आहेत.

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी आश्रमशाळेचे व्यवस्थापक आणि स्वयंपाक करण्यासाठी येणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आश्रमातील काही मुलांना कोरोनाची लक्षण जाणवायला लागली. ज्यानंतर सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली ज्यात १९ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला. या आश्रमशाळेत सर्व निराधार, भीक मागणारी व रेड लाईट परिसरातील मुलं आहेत. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय ही संस्था लोकसहभागातून मुलांची देखभाल आणि शैक्षणिक सुविधा पुरवत असते. १९ मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर संस्थाचालकांनी संपूर्ण आश्रम सॅनिटाईज करुन घेतला आहे. तसेच उर्वरित मुलांना कोणतीही लक्षण आढळत नाहीत ना याचीही तपासणी केली जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT