Pune Police Suicide: पुण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: पुणे (Pune) जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमधील (Pimpari Chinchwad) वाकड भागात महिला पोलीस (Lady Police) कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला पोलीस कर्मचारी पुणे पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेत नोकरी करत होती. श्रद्धा शिवाजी जयभाय (वय 28) असं आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा हिला सोमवारी अधिकृत सुट्टी होती. याशिवाय तिने दोन दिवसांची आणखी अधिकृत रजा घेतली होती. श्रद्धा ही वाकड येथे आपल्या चार वर्षाच्या मुलीसह एकटीच राहत होती.

तिचा पती भारतीय नौदलात नोकरीस असल्याने कामानिमित्त तिला पुण्यातच मुलीसह राहावं लागत होते. तर तिचा पती सध्या केरळमध्ये ड्युटीवर आहे. तर अहमदनगरमध्ये तिचे सासू आणि सासरे राहतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार श्रद्धा शिवाजी जयभाय हिने आत्महत्या केली आहे. श्रद्धाचा एक मित्र तिला रात्रीपासूनच कॉल करीत होता. पण श्रद्धा फोन उचलत नव्हती. तिच्या मित्राला वाटले की कदाचित ती झोपली असेल. त्यानंतर मित्राने सकाळी श्रद्धाला फोन केला पण श्रद्धा सकाळीसुद्धा फोन उचलत नव्हती.

त्यामुळे श्रद्धाचा मित्र तिच्या घरी पोहोचला. त्यावेळी मित्राने बराच वेळ दार ठोठावले पण श्रद्धाने दरवाजा उघडला नाही. यावेळी मित्राने आजूबाजूच्या लोकांची मदत घेतली. पण तरीही तिचा आतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांना पाचारण केलं.

ADVERTISEMENT

दरम्यान, घटनास्थळी पोहचताच पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी श्रद्धा त्यांना छताच्या पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. सकृतदर्शनी तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र तरीही पोलीस या प्रकरणाचा वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत. दरम्यान, श्रद्धाच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

सोलापुरात महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, पतीचा खळबजनक आरोप

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर म्हणाले की, घटना स्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. तसेच आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस खात्यात असणाऱ्या श्रद्धा हिने अशा प्रकारचं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत आता पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे पुणे पोलिसांमध्ये देखील खळबळ माजली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT