धक्कादायक… लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नाचता-नाचता तरुणाचा मृत्यू
बैतुल (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील बैतुल येथे एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नाचत असताना एक तरुण अचानक कोसळला. सुरुवातीला नेमकं काय घडलं ते लोकांना काहीच समजलं नाही. लोकांना सुरुवातीला वाटलं की, डान्स करत असल्याने तरुण मुद्दामून जमिनीवर झोपला आहे. मात्र बराच वेळ झाला तरी तो उठत नसल्याने जेव्हा लोकांना त्याला उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो बेशुद्ध असल्याचं […]
ADVERTISEMENT
बैतुल (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील बैतुल येथे एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नाचत असताना एक तरुण अचानक कोसळला. सुरुवातीला नेमकं काय घडलं ते लोकांना काहीच समजलं नाही. लोकांना सुरुवातीला वाटलं की, डान्स करत असल्याने तरुण मुद्दामून जमिनीवर झोपला आहे. मात्र बराच वेळ झाला तरी तो उठत नसल्याने जेव्हा लोकांना त्याला उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो बेशुद्ध असल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
ADVERTISEMENT
नाचताना तरुणाचा मृत्यू
हे प्रकरण मध्य प्रदेशच्या जामुन धाना गावातील आहे. जिथे लग्नाच्या स्वागत समारंभात नाचणाऱ्या अंतलाल उईके या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अंतलाल हा डोरी गावचा रहिवासी असून त्याचा नातेवाईक सोनू कुमरे याच्या लग्नात जामुन धाना गावात आला होता. शुक्रवारी लग्न होतं आणि शनिवारी रिसेप्शन. दरम्यान रिसेप्शनवेळी डीजेवर तो बेधुंद होऊन नाचत होता. काही वेळाने तो नाचताना खाली पडला.
हे वाचलं का?
घटनास्थळी उपस्थित लोकांना सुरुवातीला वाटलं की, अंतलाल हा डान्स करताना मजा मस्ती करत आहे. त्यामुळे अनेक जण मोबाइलवर त्याचा व्हीडिओ शूट करत बसले. तो खाली पडला तरीही लोक त्याचा व्हीडिओच शूट करत होते. पण बराच वेळ त्याच अवस्थेत असल्याचं दिसल्यानंतर लोकांना त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच अंतलालच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. अंतलाल हा तीन बहिणींना एकुलता एक भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला एक 5 वर्षांची मुलगीही आहे.
ADVERTISEMENT
या घटनेनंतर लग्नाच्या आनंदाच्या वातावरणावर दु:खाची झालर पसरली आहे. मृतांच्या नातेवाइकांची अवस्था तर अत्यंत वाईट झाली आहे. सगळ्यांनाच अंतलालच्या मृत्यूचं नेमकं कारण जाणून घ्यायचं आहे. यासाठी सर्वजण शवविच्छेदन रिपोर्टची वाट पाहत आहेत. पोलीसही या प्रकरणाचा सध्या गांभीर्याने तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT