भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे नागपुरात चार वर्षीय मुलीचा मृत्यू
नागपूर शहरात भटक्या कुत्र्यांनी हल्ला करुन शरिराचे लचके तोडल्यामुळे एका चार वर्षीय मुलीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. नागपूर जवळील भारकस गावात ही घटना घडली असून अंजली रावत असं मृत बालिकेचं नाव आहे. या घटनेनंतर भारकस गावात नागरिकांमध्ये दहशत पसरली असून लोकांनी आपल्या मुलांना घराबाहेर पाठवणं बंद केलंय. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे […]
ADVERTISEMENT
नागपूर शहरात भटक्या कुत्र्यांनी हल्ला करुन शरिराचे लचके तोडल्यामुळे एका चार वर्षीय मुलीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. नागपूर जवळील भारकस गावात ही घटना घडली असून अंजली रावत असं मृत बालिकेचं नाव आहे. या घटनेनंतर भारकस गावात नागरिकांमध्ये दहशत पसरली असून लोकांनी आपल्या मुलांना घराबाहेर पाठवणं बंद केलंय.
ADVERTISEMENT
जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
अंजली रावत आपल्या आई-वडिलांसह बुटीबोरी औद्योगिक क्षेत्राजवळील भारकस गावात राहत होती. अंजलीचे आई-बाबा कामगार होते. १३ जानेवारी रोजी अंजली चे आई वडील कामावर गेले असताना दुपारच्या सुमारास अंजली घरासमोर खेळत असताना दगडाची ठेच लागून ती खाली पडली. अंजली खाली कोसळली असतानाच भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. घाबरलेली अंजली किंचाळल्यानंतर शेजारील आणखी दोन कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढवला. तिन्ही कुत्र्यांनी अंजलीच्या पाठीचे, कंबरेचे आणि पायाचा चावा घेत अक्षरशः लचके तोडले. अंजलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकल्यानंतर शेजारच्यांनी तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली.
हे वाचलं का?
या घटनेनंतर गावकऱ्यांनी अंजलीला टाकळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. परंतू कुत्र्याने अतिशय वाईट पद्धतीने लचके तोडलेले असल्यामुळे अंजलीवर इथे चांगल्या पद्धतीने उपचार होऊ शकले नाहीत. यानंतर अंजलीला नागपुरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं. परंतू उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT