Omicron : महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं! ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले एकाच दिवशी आढळले 7 रुग्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Omicron या कोरोना व्हायरसच्या व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. कारण डोंबिवलीत पहिला रूग्ण आढळल्याची बातमी ताजी असतानाच आता पुण्यात एकाला तर पिंपरीत सहा जणांना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

24 नोव्हेंबर 2021 ला नायजेरियातल्या लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली 44 वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली अशा एकूण सहा जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमिक्रॉन (Omicron) विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे. तसेच पुणे शहरातील एका 47 वर्षीय पुरुषाला देखील या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालाने स्पष्ट केलं आहे.

यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 8 झाली आहे.

हे वाचलं का?

• या सहा जणांपैकी तिघेजण नायजेरियाहून आले आहेत तर इतर तिघे त्यांचे निकटसहावासित आहेत.

• नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची 44 वर्षांची महिला तिच्या 12 आणि 18 वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

ADVERTISEMENT

• या तिघींच्या 13 निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून त्यातील या महिलेचा 45 वर्षाचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि ७ वर्षांच्या दोन मुली या कोविड बाधित आल्या होत्या. या तिन्ही निकटसहवासितांमध्ये देखील ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे.

ADVERTISEMENT

नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर पाचजणांना कसलीही लक्षणे नाहीत.

• या सहा जणांपैकी तिघे हे 18 वर्षांखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही.

• उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोर्बोक्सिन ही लस घेतलेली आहे.

• हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात दाखल असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

पुणे शहरातील ओमायक्रॉन बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला असून हा रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर 2021 या काळात फिनलंड येथे गेला होता. 29 तारखेला थोडासा ताप आला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोव्हिड बाधित आढळला. त्याने कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असून सध्या त्यांना कोणतीही लक्षणे नसून प्रकृती स्थिर आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT