नागपूर : ८१ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीची आत्महत्या
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डात एका ८१ वर्षीय वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घरगुती कारणं आणि कोविडच्या भीतीमुळे या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. कोविड रुग्णालयात असलेल्या बाथरुममध्ये इक्झॉस फॅनला गळफास घेऊन या व्यक्तीने आपलं आयुष्य संपवलं आहे. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत […]
ADVERTISEMENT
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डात एका ८१ वर्षीय वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घरगुती कारणं आणि कोविडच्या भीतीमुळे या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. कोविड रुग्णालयात असलेल्या बाथरुममध्ये इक्झॉस फॅनला गळफास घेऊन या व्यक्तीने आपलं आयुष्य संपवलं आहे. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता असल्याचं चित्र आहे. अशातच शासकीय रुग्णालयात झालेल्या या आत्महत्येमुळे एकच खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
नागपुरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे तर रुग्णालयात बेड्सची कमतरता असल्याचं चित्र समोर येतंय. गेल्या ५ दिवसांपासून शहरात ३ हजाराच्या वर कोरोनाग्रस्त रुग्ण सापडत असून दररोज ५० च्या वर लोकं आपला जीव गमावत आहेत. शहरात एवढी गंभीर परिस्थिती असताना शासकीय महाविद्यालयात व्हेटिंलेटरसाठी वेटिंग असल्याचं चित्र पहायला मिळतंय.
नागपुरात ३० मार्च सकाळी १० वाजेपर्यंत उपलब्ध असलेले बेडची संख्या –
हे वाचलं का?
खासगी हॉस्पिटल बेड स्थिती :
-
ऑक्सिजन बेड – ९८
ADVERTISEMENT
आयसीयु बेड – ४३
ADVERTISEMENT
व्हेंटिलेटर बेड- ८
शासकीय रुग्णालय बेड स्थिती :
-
ऑक्सिजन बेड- २४८
-
आयसीयू बेड- ५४
-
व्हेंटिलेटर बेड- १४
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT