ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा वारकरी संप्रदाय आणि युवक व्यसन मुक्ती संघटनेचे राज्य अध्यक्ष बंडातात्या कराडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात आणि इतर 125 जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाईन विक्रीला विरोध करणारं आंदोलन बंडातात्या कराडकर यांनी गुरूवारी केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार या दोघांचा […]
ADVERTISEMENT
इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा
ADVERTISEMENT
वारकरी संप्रदाय आणि युवक व्यसन मुक्ती संघटनेचे राज्य अध्यक्ष बंडातात्या कराडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात आणि इतर 125 जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाईन विक्रीला विरोध करणारं आंदोलन बंडातात्या कराडकर यांनी गुरूवारी केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार या दोघांचा उल्लेख त्यांनी ढवळ्या आणि पवळ्या असा केला होता.
गुरुवारी साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे दंडवत आणि दंडुका आंदोलन केलं. या आंदोलना दरम्यान कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
शाळेत खिचडीऐवजी वाईन द्या अन् मंदिरातही व्यवस्था करा; बंडातात्या कराडकरांचे सरकारला टोले
या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी जमली होती. त्या सर्वांनी कोरोना नियमाचे उल्लंघन केले. यामुळे पोलिसांनी प्रकाश जंत्रे उर्फ बंडा तात्या कराडकर, विकास जवळ, मनोज निंबाळकर यांच्यासह १२५ जणांवर गुन्हा दाखल केला. साथरोग अधिनियमन ३ तसेच १८८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) व १३५ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केली होती. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख ढवळ्या आणि पवळ्या असा केला होता. त्यावरून अद्याप सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
राज्य सरकारने किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी दंडवत दंडुका आंदोलन पुकारण्यात आलं होतं. त्या आंदोलनादरम्यान दंडुका घेण्यास परवानगी नाकारात पोलिसांनी फक्त दंडवत आंदोलनाला संमती दिली होती. या आंदोलनादरम्यान सरकारने घेतलेला वाईन विक्रीचा निर्णय कसा चुकीचा आहे आणि दादागिरी दाखवणारा आहे असा उल्लेख बंडातात्या कराडकर यांनी केला होता. एवढंच नाही तर सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे आणि इतर नेत्यांची मुलं दारू पितात असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. भाषणादरम्यान हे सगळं बोलल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतानाही या सगळ्याचा पुनरूच्चार केला होता. या संदर्भात त्यांच्या विरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र कोरोना नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता बंडातात्या कराडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT